श्री शिर्डी साई बाबा यांच्या १०४ व्या महासमाधी दिन उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन ..
धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन 

पनवेल दि.०४ (संजय कदम) : श्री शिर्डी साई बाबा यांच्या 104 व्या महा समाधी दिन उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे प.पू. सद्गुरु श्री साई नारायण बाबा यांच्या आध्यात्मिक उपस्थितीत बुधवारी दिनांक 5 ऑक्टोबर 2022 रोजी श्री साई नारायण बाबा आश्रम, पनवेल येथे आयोजन करण्यात आले आहे.   
  श्री शिर्डी साई बाबा यांच्या 104 व्या महा समाधी दिन उत्सवानिमित्त बुधवारी दिनांक 5 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी १ ते रात्री ८.३० पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये भूपाली, काकड आरती, पूजा, महाभिषेक तसेच बाबांच्या अर्चना व आरतीसह एकादश्याद्रव्य महानुद्राभिषेकाची आरती यांच्यासह १०८ वेळा दूध अभिषेक, श्री महा चरण पूजा, श्री साई पालखी आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहे. तसेच श्री साई बाबांच्या अद्वितीय जीवन आणि शिकवणी या विषयावरील प्रवचनावरील चित्रफितीचे अनावरण, मध्य आरती नंतर महाप्रसादाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर संध्याकाळी ४.३० वाजता श्री साई महिमा, श्री गुरु महिमा आणि सांयकाळी ६ वाजता गोधूली आरती, सांयकाळी ६.३० वाट श्री साई भजन, संध्या ८.३० वाजता महा मंगल शेज आरती होणार असून त्यानंतर महाप्रसादचा कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व साईभक्तांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
फोटो : प पू सद्गुरु श्री साई नारायण बाबा
Comments
Popular posts
बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड प्रत्यके शिवसैनिकांनी घराघरात जाऊन केला पाहिजे- पुणे संपर्क प्रमुख व आ.सचिन अहिर
Image
पर्यावरण पूरक गणेश उत्सव ; हाच खरा गणेश उत्सव - सुप्रसिद्ध डॉ.गिरीश गुणे
Image
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष महेबूब शेख यांची प्रमुख उपस्थिती
Image
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलतर्फे "सेवाश्री" पुरस्काराने प्रितम म्हात्रे सन्मानित..
Image
केदार भगत मित्र परिवार यांच्या "गणपती आरती संग्रह पुस्तकाचे मा.खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याहस्ते प्रकाशन...
Image