स्व.सौ.मुग्धा लोंढे यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन...
स्व.सौ.मुग्धा लोंढे यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
पनवेल / अनिल कुरघोडे :-- 
स्व.सौ.मुग्धा गुरुनाथ लोंढे यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन रविवार दि.२ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ यावेळेत श्री विरुपाक्ष मंगल कार्यालय पनवेल येथे आयोजित करण्यात आले आहे.

स्व.सौ मुग्धा गुरुनाथ लोंढे या आपल्यातून जाऊन तीन वर्षे पूर्ण होत आहेत, या निमित्त त्यांचे पुण्यस्मरण होईल या हेतूने जनहित संवर्धक मंडळ, कच्छ युवक संघ, युवानाद, रुधिरसेतू, सन्मित्र मंडळ, श्रीकृष्ण सांस्कृतिक मंडळ पनवेल यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

पहिल्या दोन स्मृतिदिनावेळी कोविडचा प्रादुर्भाव असताना देखील नागरिकांनी भरभर रक्तदान केले, त्याचप्रमाणे २ ऑक्टोबर रोजी देखील असाच भरभरून नागरिकांनी रक्तदानास प्रतिसाद द्यावा असे आवाहन मा.नगरसेविका रुचिता लोंढे,गुरुनाथ लोंढे व ओझे कुटुंबीयांनी केले आहे.
Comments