पनवेल तालुक्यात १३ ते ३० सप्टेंबर या दरम्यान कुष्ठरोग व क्षयरोग अभियान..
पनवेल तालुक्यात १३ ते ३०  सप्टेंबर या दरम्यान कुष्ठरोग व क्षयरोग अभियान

पनवेल दि.१२(वार्ताहर): पनवेल तालुक्यात १३ ते ३० सप्टेंबर या दरम्यान कुष्ठरोग व क्षयरोग अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती सहाय्यक संचालक डॉ. आर. एच. बाविस्कर यांनी दिली.
              मागील दोन वर्षांमध्ये पनवेल तालुक्यातील २१६ कुष्ठरोगी बरे झाले आहे आहेत. तर चालूवर्षी पनवेलमधील १२१ कुष्ठरुग्ण उपचार घेत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत १३ ते ३० सप्टेंबर २०२२ या कालावधीत “कुष्ठरोग शोध मोहीम" व राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत “सक्रिय क्षयरोग शोध मोहीम" राबविण्यात येणार आहे. तालुके व महानगरपालिका क्षेत्रात ही मोहीम राबविण्यासाठी ३ लाख ८६ हजार ४०० लोकांचे सर्वेक्षण होणार असून त्यासाठी एकूण २७६ आरोग्यपथके व ५५ पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत. तालुक्यातील एकूण ७७ हजार २८० घरांमध्ये सर्वेक्षण होणार आहे.

--
Comments