पनवेल सीएसएमटी लोकलमध्ये मृतदेह सापडल्याने खळबळ
पनवेल, दि.२१ (वार्ताहर)- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते पनवेल या लोकल गाडीमध्ये काल एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी जावून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे. रुग्णालयातील अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण समजू शकेल, असे याविषयी माहिती देतांना पोलिसांनी सांगितले.
मृत व्यक्ती ३५ ते ४० वर्षाची असून त्याची अद्यापी ओळख पटली नसून त्याबाबत पोलिसांनी पुढील प्रयत्न सुरू केले आहेत.