जयभारत नाका परिसरात स्वच्छता मोहीम..
पनवेल दि.०३ (संजय कदम) : पनवेल महानगरपालिकेचे मा. नगरसेवक राजू सोनी यांनी तत्परतेने जयभारत नाका परिसरात स्वच्छता मोहीम राबवून तो परिसर कचरामुक्त करून दिला.
मा. नगरसेविका नीता माळी यांनी जयभारत नाका, शिवाजी रोड शकुन बिल्डिंग परिसरात गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात कचरा साठला होता. याबाबत मा. नगरसेविका नीता माळी यांनी पनवेल महानगरपालिकेच्या संबंधित खात्याला कळवून सुद्धा येथील कचरा उचलला नव्हता. त्यामुळे सदर नागरी समस्या मा. नगरसेविका नीता माळी यांनी मा. नगरसेवक राजू सोनी यांच्या कानावर घातली असता त्यांनी तत्परतेने त्या परिसरात विशेष यंत्रणा राबवून तो परिसर स्वच्छ व कचरामुक्त करून दिल्याने येथील रहिवाश्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
फोटो : जयभारत नाका परिसर स्वच्छ करून घेताना मा. नगरसेविका नीता माळी