नांदेड ते मातोश्री पायी प्रवास करणाऱ्या साईरामचे पनवेल मध्ये उत्स्फूर्त स्वागत..
नांदेड ते मातोश्री पायी प्रवास करणाऱ्या साईरामचे पनवेल मध्ये उत्स्फूर्त स्वागत..

पनवेल / दि.१० (अनिल कुरघोडे ) : -  
शिवसैनिकांनी संघर्षाच्या काळात खचून न जाता एकजुटीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा संदेश घेऊन नांदेड ते मातोश्री (मुंबई) असा प्रवास करणारे शिवसैनिक साईराम कनकुंटवार यांचे पनवेल शाखेत स्वागत करून औक्षण करण्यात आले.

यावेळी त्यांनी सांगितले की माझा पायी प्रवास हा किनवट, जिल्हा नांदेड येथून सुरू झाला. आजचा माझा अठरावा दिवस असून मी रोज अंदाजे पायी चाळीस किलोमीटर चालत आहे, जागो जागी शिवसैनिकांच्या भेटी होत आहेत, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद  मिळत आहे, काही नेते गेले असले तरी शिवसैनिक मात्र त्यांच्या पाठीशी ठाम असल्याचे आत्तापर्यंतच्या प्रवासात दिसून आल्याचे साईराम ने सांगितले.

याप्रसंगी रायगड जिल्हासल्लागार शिरीष बुटाला, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, तालुका प्रमुख विश्वास पेटकर, अच्युत मनोरे, प्रविण जाधव, अर्चना कुळकर्णी, सुजन मुसलोंडकर, सचिन पाटील, बापू जोशी, कुणाल कुरघोडे, राकेश टेमघरे, गौतम लोखंडे, आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
Comments