प्रामाणिक रिक्षा चालकाकडून बॅग तर मिळालीच, पण बक्षिशीही नाकारली..
प्रामाणिक रिक्षा चालकाकडून बॅग तर मिळालीच, पण बक्षिशीही नाकारली..

पनवेल / वार्ताहर : -   रिक्षा चालकाने पैसे जास्त घेतले, रिक्षा चालक भाडे नाकारतात, रिक्षा चालकाने फसवले.. अशाच प्रकारचे किस्से कानावर पडत असतात. पण रिक्षात राहिलेली बॅग परत करून बन्सीलाल भामरे या रिक्षा चालकाने एक नवा आदर्श समोर आणला आहे.

एम एल धानेकर कॉलेज मुंबई येथे शिकणारी विद्यार्थिनी रितिका रमेश कांबळे ही खारघर येथील राहणाऱ्या चुलत भावाकडे आली होती. रितिकाने खारघर सेक्टर १० ते सेंट्रल पार्क गार्डन असा प्रवास बन्सीलाल यांच्या रिक्षाने केला. ज्या ठिकाणी जायचे होते, तेथे उतरल्यानंतर आपली बॅग जवळ नसल्याचे रितिका यांच्या लक्षात आले. मात्र, तो पर्यंत रिक्षा निघून गेली होती. रिक्षात राहिलेल्या बॅगमध्ये काही महत्त्वाची कागदपत्रे,  पावत्या, परीक्षेत बसण्याकरता लागणारे हॉल तिकीट आणि रोख रक्कम होती. रिक्षात बॅग राहिल्याचे लक्षात आल्यानंतर बन्सीलाल यांनी बॅगमधील ओळखपत्र बघितले व त्यांनी खारघर एकता रिक्षा संघटनेचे उपध्यक्ष जयेंद्र कोळी यांना फोन केला. कोळी यांनी ती ब्याग खारघर पोलीस ठाण्यात जाऊन देण्याचा सल्ला रिक्षा चालक 
बन्सीलाल यांना दिला.बन्सीलाल यांनी खारघर पोलीस ठाण्यात धाव घेता. रिक्षा प्रवासी रितिका कांबळे तेथे उपस्थित होत्या . पोलीस इन्स्पेक्टर विमल बिडवे पोलीस  किरण पाटील  , संतोष पिलाने, विशाल बोरसे यांच्या उपस्थितीत रिक्षा चालकाने रितिका हिला बॅग सोपवली. पैसे व महत्त्वाची कागदपत्रे घेऊन आलेल्या बन्सीलाल यांना रितिका यांनी बक्षिशी देऊ केली. मात्र, बन्सीलाल यांनी ती नम्रपणे नाकारली.
Comments