के.गो.लिमये सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयात स्वातंत्र्याचा ७५ वा अमृतमहोत्सव साजरा..
के.गो.लिमये सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयात स्वातंत्र्याचा ७५ वा अमृतमहोत्सव साजरा

पनवेल वैभव / प्रतिनिधी : - के.गो.लिमये सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयात सोमवार दि.-१५/०८/२०२२ रोजी ७५ वा अमृतमहोत्सवानिमित्त पनवेलचे सुप्रसिद्ध कवी, गझलकार,लेखक अ.के.शेख यांच्या शुभहस्ते झेंडा वंदन व राष्ट्रध्वजाला मानवंदना देणेत आली. 

या कार्यक्रमाकरीता प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कवी,लेखक,संपादक श्री.रोहिदास पोटे माजी शिक्षण अधिकारी हे उपस्थित होते. संस्थेचे उपाध्यक्ष श्याम वालावलकर ,कार्याध्यक्ष
विनायक वत्सराज, कार्यवाह काशिनाथ जाधव, सह.कार्यवाह जयश्री शेट्ये, प्रशांत राजे, अ‍ॅड. माधुरी थळकर, हिमालिनी कुलकर्णी, सुनिल खेडेकर , रमेश चव्हाण, श्रुती वीरकर, राजेंद्र शेट्ये, धनसे शाहीद, राजे , स्मिता पाटील ग्रंथपाल निकेता शिंदे, शारदा कदम ,स्नेहल चौगुले, संजय दिवटे आदी उपस्थित होते.

तसेच याप्रसंगी अ.के.शेख यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आत्तापर्यंतच्या सुवर्णमयी आठवणींना उजाळा देऊन स्वरचित उत्साहपर राष्ट्रगौरव गीत गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image