पनवेल शहरातील २७३ भुखंडावरील कॅन्टींगचे बांधकाम अधिकृत असल्याचा रमेश गुडेकर यांचा दावा...
 रमेश गुडेकर यांचा दावा..

पनवेल / वार्ताहर : - 

पनवेल शहरातील २७३ भुखंडावरील कॅन्टींगचे बांधकाम अधिकृत असल्याचा दावा माजी नगरसेवक रमेश गुडेकर यानी पनवेल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. नुकताच उरण नाका मार्गावरील भूखंड क्र २७३ वरील कॅन्टींग तोडण्यात आली होती. सदर या कँटिंगचे बांधकाम पुन्हा नव्याने करण्यात आले असून या कंन्टींगचे बांधकाम अनधिकृत नाही तर ते महानगरपालिकेच्या परवानगीने सुरू असल्याचे माजी नगरसेवक गुडेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
यापूर्वी उरण नाका येथे असलेल्या एस टी बस थांब्यामध्ये मध्ये ही कॅन्टींग होती.परंतु हा थांबा तोडल्याने या विरुद्ध आम्ही न्यायालयात धाव घेतली त्यामध्ये आमचा समझोता झाला. तेव्हाच्या नगरपालिकेने भुखंड क्र. २७३ येथे हा बस थांबा बांधला. या बस थांब्यामध्ये पर्यायी कँटिंग तेथे दिली. त्याचा अधिकृत करारही झाला आहे. परंतु आता महापालिकेतर्फे ती कैन्टीन तोडण्यात आली. अधिकृत कागदपत्रे असतानाही ती तोडू नये म्हणून माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, माजी नगरसेवक गणेश कडू, शिवसेनेचे दिपक निकम व स्वतः रमेश गुडेकर यांनी आयुक्तांची भेट घेतली व ही कारवाई अयोग्य असल्याचे सांगितले.

घाईगर्दीने ही कॅन्टीग तोडल्याचे सांगून पुन्हा ती कॅन्टींग बांधण्यास आम्हाला आयुक्त यांनी परवानगी दिली असल्याचे रमेश गुडेकर यांनी पत्रकार परिषदमध्ये सांगितले.
Comments