पनवेल लाईन आळी येथे श्री कृष्णजन्मोत्सव उत्साहात साजरा..
पनवेल लाईन आळी येथे श्री कृष्णजन्मोत्सव उत्साहात साजरा..
पनवेल / ( अनिल कुरघोडे)   
पनवेल लाईन आळी येथील श्री हनुमान मंदिरात श्री कृष्णजन्मोत्सव व गोपाळकाला उत्सव मोठया उत्साहात साजरा झाला.
                  शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या पनवेल मधील लाईन आळी येथील श्री हनुमान मंदिरात सालाबादप्रमाणे कोविड च्या दोन वर्षांच्या कालावधीनंतर श्री कृष्ण जन्मोत्सव साजरा झाला यात अनेक वर्षांच्या परंपरे नुसार पूर्ण आठवडाभर चोवीस तास हरिनाम सप्ताह सुरू होता,यावेळी प्रत्येक जण वीणा घेऊन हरिनाम घेतो त्यांना विणेकरी अथवा पहारेकरी असे संबोधण्यात येते, त्याच प्रमाणे कृष्ण जन्म होई पर्यंत दररोज रात्री पांडव कालीन सारीपाट खेळला जातो त्याला पट असे देखील म्हटले जाते,त्यानंतर सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी अष्टमीला रात्री बारा वाजता श्री कृष्णजन्मोत्सव श्री कृष्णाचा पाळणा व आरती व प्रसाद म्हणून सुंठवडा वाटून  साजरा केला जातो.
त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी  गोपाळकाल्याला सकाळी श्री हनुमान मंदिरासमोर देवाची हंडी काठीने फोडण्यात येते यावेळी पनवेल मधील बहुतेक अस्थानांचे वारे येथे येऊन गोपाळकाल्याचा आनंदोत्सव साजरा करतात. 
                       यानंतर श्री हनुमान मंदिरातून श्री कृष्णाच्या पालखी सोहळ्यास सुरवात होते, या पालखी परिक्रमेत ज्या-ज्या ठिकाणी देवतांची मंदिरे आहेत त्या ठिकाणी आरती होते व प्रसाद दिला जातो. पालखी परिक्रमेची सुरवात छत्रपती शिवाजी महाराज रोड लाईन आळी पासून जय भारत नाका त्यानंतर टिळक रोड ते स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, तेथून रामेश्वर मंदिर येथे आरती होऊन पालखी विसर्जन सोहळा पार पडतो.
                      श्री मंदिराच्या परंपरेनुसार गोपाळकाल्याचा महाप्रसाद हा श्रावण शुद्ध द्वादशी म्हणजेच त्याला बारस म्हणतात या दिवशी होतो , यावेळी पनवेलमधील भक्तगण श्री हनुमान मंदिरात येऊन महाप्रसादाचा लाभ घेऊन गोपालकृष्ण महाराज की जय याचा जयघोष होऊन उत्सवाची सांगता होते.
या प्रसंगी मंदिराचे पदाधिकारी, विश्वस्त,भक्तगण कार्यकर्ते यांचे मोठे योगदान असते.
Comments