पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने प्रबोधनकारांचा सन्मान...
समाज प्रबोधनाचा वारसा वारकर्‍यांनी व पत्रकारांनी असाच कायम सुरू ठेवावा ः मा. नगराध्यक्ष जे.एम. म्हाञे

पनवेल (प्रतिनिधी)
महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखले जाते. पनवेल तालुक्यातही ही संतांची परंपरा कायम ठेवण्यात वारकरी सांप्रदायाची मोठी भूमिका आहे. वारकरी हे समाजप्रबोधनाचे काम करत एक सक्षम समाज घडविण्यासाठी प्रयत्नशील असतात मात्र प्रसिध्दीपासून ते दूरच असतात. समाजप्रबोधनाचे काम करणार्‍या या वारकर्‍यांच्या कार्याचा सन्मान म्हणून पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने पनवेल तालुक्यातील 22 समाजप्रबोधनकारांचा सत्कार करुन खरच एक स्त्युत्य उपक्रम राबविला आहे. समाज प्रबोधनाचा वारसा वारकर्‍यांनी व पत्रकारांनी असाच कायम सुरु ठेवावा असे प्रतिपादन पनवेल नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे यांनी केले.  नवीन पनवेल येथील बांठीया हायस्कूलच्या सभागृहात आयोजित पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या सन्मान प्रबोधनाचा या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी वारकरी मोठया प्रमाणात उपस्थित होते.
पनवेल तालुक्यातील संत तुकाराम महाराज कोकण दिंङीला प्रथम क्रमांक प्राप्त होऊन त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान होणे ही पनवेलकरांसाठी मोठी अभिमानास्पद बाब असल्याचे सांगत त्यांनी या दिंडीचे कौतुक केले. महाराष्ट्राला वारकर्‍यांनी प्रबोधन करण्याचे काम अविरत सुरू ठेवले आहे. त्यांच्या प्रबोधनातून संपूर्ण पिढी घडवण्याचे कार्य होत असते. वारकर्‍यांची दिंङी जेव्हा माऊलींच्या दर्शनाला निघते तेव्हा त्यांची शिस्तबद्धता व भक्ती पाहून समाजाला त्यांच्यात एकरूप व्हावेसे वाटते. ही परंपरा पनवेलकरांनी देखील तेवढीच जपली आहे. पनवेलच्या संत तुकाराम महाराज कोकण दिंङीला याच शिस्तबद्ध पद्धतीमुळे राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला याबद्दल समस्त पनवेलकरांना अभिमान वाटत आहे. या दिंङीचा व समाजाचे प्रबोधन करणार्‍या कीर्तनकारांचा सन्मान पनवेल तालुका पत्रकार संघर्ष  समितीने केला याबद्दल पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अभिनंदन करावेसे वाटते. हा समाज प्रबोधनाचा वारसा वारकर्‍यांनी व पत्रकारांनी असाच कायम सुरू ठेवावा असेही शेवटी जे.एम. म्हात्रे म्हणाले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, उद्योजक इक्बालशेठ काजी, माजी नगरसेवक गणेश कङू, माजी नगरसेविका सुशिला घरत, उद्योजक तुकाराम दुधे, उद्योजक राजेंद्र कोलकर, ह.भ.प. .पद्माकर महाराज पाटील, ह.भ.प. धाऊशेठ धर्मा पाटील व पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे हे व्यासपिठावर उपस्थित होते.
यावेळी संत तुकाराम महाराज कोकण दिंडीला प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल या दिंडीचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. दिंडीच्या वतीने दिंडीचे अध्यक्ष पद्माकर महाराज पाटील यांनी हा पुरस्कार स्विकारला. या दिंडी बरोबरच ह.भ.प. कृष्णा महाराज पाटील, ह.भ.प. राघो महाराज कडव, ह.भ.प. संतोष महाराज सते,  ह.भ.प. महादेव महाराज शेळके,  ह.भ.प. प्रकाश महाराज पाटील,  ह.भ.प.  संजय महाराज पाटील,  ह.भ.प. शुभम महाराज जाधव, श्री विठ्ठल रखुमाई चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष  ह.भ.प. धाऊशेठ धर्मा पाटील, महाराष्ट्र वारकरी महामंडळ रायगड जिल्हाध्यक्ष  ह.भ.प. पुंडलिक महाराज फडके,  ह.भ.प. रघुनाथ महाराज पाटील,  ह.भ.प. सुरेश महाराज पाटील,  ह.भ.प. बामा महाराज भोपी,  ह.भ.प. लालचंद महाराज राजे,  ह.भ.प. संजय महाराज पाटील,  ह.भ.प. श्रीकांत महाराज रसाळ,  ह.भ.प. वंदनाताई महाराज घोंगडे,  ह.भ.प. राजेंद्र नामदेव पाटील,  ह.भ.प. विनया विजय पाटील,  ह.भ.प. सविता धाऊ पाटील,  ह.भ.प. बळीराम महाराज भगत,  ह.भ.प. सिताराम महाराज जळे यांना मान्यवरांच्या हस्ते शाल, तुळस, टोपी, ज्ञानेश्‍वरी व सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण मोहोकर यांनी केले. 
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता अध्यक्ष निलेश सोनावणे यांच्या अध्यक्षतेखाली कार्याध्यक्ष संतोष भगत, उपाध्यक्ष आनंद पवार, उपाध्यक्ष गणपत वारगडा, सचिव रविंद्र गायकवाड, खजिनदार विशाल सावंत, प्रसिध्दीप्रमुख संतोष सुतार, सल्लागार दिपक महाडिक,  मयुर तांबडे, अनिल भोळे, अनिल कुरघोडे, सुनिल कटेकर, दिपक घोसाळकर, गौरव जहागीरदार,  भरतकुमार कांबळे, कल्पेश कांबळे आदंीनी मेहनत घेतली. यावेळी सभागृह उपलब्ध करुन दिल्याबद्दल सुधागड एज्युकेशन सोसायटीचेही आभार मानण्यात आले. यावेळी पत्रकार संजय कदम, सय्यद अकबर, किरण बाथम, शंकर वायदंडे आदी उपस्थित होते.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या देवद शाखेतर्फे आषाढी एकादशी निमित्त भाविकांना तुळशी रोपांचे वाटप...
Image