१ लाख ३३ हजाराचा मुद्देमाल जप्त..
पनवेल दि. ११ ( वार्ताहर ) :- रस्त्यावरून मोबाईलवर बोलत जाणाऱ्याच्या हातातली मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या तीन आरोपीच्या मुसक्या आवळण्यात मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखा नवी मुबई च्या पथकाला यश आले आहे. या मोबाईल चोरी प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना कोपरखैरणे येथून अटक केली आहे. या तीन आरोपीकडून 1 लाख 33 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या तीन जणांच्या टोळीने नवी मुबई परिसरातील नेरुळ, एपीएमसी, वाशी , तुर्भ आणि एनआरआय पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल चोरी केल्याचे उघड झाले आहे.
नवी मुबई शहरात मोबाईल स्नॅचिंग करून मोबाईल ची चोरी करणाऱ्याच्या संख्येत गेल्या काही दिवसां पासून वाढ झाली होती, या वाढत्या चोरीवर आळा घालण्यासाठी विषेश मोहीम राबविण्याचे आदेश देण्यात आले होते, या आदेशा नुसार अश्या मोबाईल चोराचा शोध घेण्यास पोलिसांकडून सुरवात करण्यात आली होती, या मोहिमे अंर्तगत काम करताना मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे याना गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली होती की, दोन इसम कोपरखैरणे डी मार्ट जवळ मोबाईल ची विक्री करण्यास येणार असल्याची माहिती मिळाली होती, या मिळालेल्या माहिती नुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिह भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार मंगेश वाट, किरण राऊत, शशिकांत शेडगे, नितीन जगताप, राहुल वाघ, आणि अन्य पोलिसांनी कोपरखैरणे डी मार्ट परिसरात सापळा रचला होता, सापळा लावल्या नंतर काही अज्ञात इसम या परिसरात संशय रित्या फिरत असल्याचे पोलिसांना आढळून आले होते. या संशयितांची चैकशी केल्या नंतर, हे अज्ञात इसम उडवा उडवीचे उत्तर देऊ लागले होते, त्या मुळे या इसमावरील संशय अधिक बळावल्या नंतर आरोपीचा संशय अधिक बळावला आणी अधिक चौकशी केली असता या आरोपी कडून मोबाईल आढळून आले, या मोबाईल ची अधिक चौकशी केली असता हे मोबाईल चोरीचे असल्याचे आरोपीने कबूल केले आहे. आकाश कांबळे वय 22 राहणार कोपखैरणे, सिद्धेश शौर्य वय 26 राहणार कोपरखैरणे आणि इम्रान शेख रहाणार शिवूड नेरुळ अशे पकडलेल्या आरोपीची नावे आहेत. या आरोपीकडून जवळपास 1 लाख 33 हजाराचा ऐवज आरोपींकडून पोलिसांनी जप्त केला आहे. या मध्ये मोबाईल आणि दुचाकी चा समावेश आहे. हे आरोपी रस्त्यावरून मोबाईल वर बोलत चालणाऱ्या चाकरमान्यांच्या हातातील मोबाईल चोरून फरार होत होते..
फोटो - पकडलेला आरोपी