मोबाईल हिसकावून चोरटे पसार ...
मोबाईल हिसकावून चोरटे पसार 

पनवेल दि.०६ (वार्ताहर) : रिक्षाची वाट पाहत असताना एका अठरा वर्षीय तरुणीचा मोबाईल मोटारसायकवरून आलेल्या चोरांनी लांबवला व ते पसार झाले. या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
कल्याण शीळ रोड येथील जान्हवी यादवाड हि खारघर (सेक्टर ३६) येथे शिक्षण घेते. कॉलेजहुन सुटल्यानंतर ती घरी जाण्यासाठी निघाली. पनवेल - मुंब्रा रस्त्यावर डोंबिवली कडे जाणाऱ्या रिक्षाची वाट पाहत ती उभी होती. यावेळी तिने मोबाईलवरून आईला फोन केला. दरम्यान, मोटारसायकल वरून आलेल्या चोराने जान्हवीच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला व ते पळून गेले.
Comments