मोटार सायकल चोर ताब्यात...
मोटार सायकल चोर ताब्यात
    
पनवेल / वार्ताहर : - शनिवार दि. 27/08/22 रोजी सकाळी 10:30 वा.चे सुमारास यशवंतराव चव्हाण  मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर स्वतः पोहवा 2598 भगत, पोना 129 महाजन, पोना 2838 पवार असे पळस्पे मोबाईल वरून गस्त करीत असताना, होंडा सिबी होर्नेट मो.सा.क्र. MH 48 BE 3701 मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर प्रवेश नसताना महामार्गावर आढळून आल्याने सदर मोटर सायकल वरील चालक नामे लक्ष्मण महादेव मस्के वय.21 रा.माटेगाव, ता.गेवराई, जि. बीड यास थांबून अधिक चौकशी केली असता त्याने समर्पक उत्तरे न दिल्याने व संशय आल्याने त्यास ताब्यात घेतले व ई- चलन डिवाइस वरून पोहवा 2598 भगत यांनी सदर गाडीचे मालकाचा शोध घेतला असता सदर मो.सा.चे मालक मौलीक मेहता यांनी सदरची गाडी काल बोरिवली इथून चोरीस गेल्याचे सांगितले. सदरची माहिती बोरिवली पोलीस ठाणेस(मुंबई  शहर) कळविली असता  बोरिवली पोलीस ठाणे (मुंबई  शहर)येथे गुन्हा रजिस्टर नंबर 1322/2022 भांदवि कलम 379   दि.27/08/2022 प्रमाणे दाखल केला असल्याचे सांगितले.   
बोरिवली पोलीस ठाण्याचे  सपोनि  तडवी  व स्टाफ असे मपो केंद्र पळस्पे येथे आले असता यांच्याकडे चोरीस गेलेली वरील नमूद मोटरसायकल  व आरोपी लक्ष्मण मस्के यास योग्य ती कार्यवाही करून सुखरूप ताब्यात देण्यात आले आहे.
Comments