कळंबोली वाहतूक पोलिसांच्या सतर्कमुळे दाम्पत्य बचावले...
पनवेल दि. १८ ( संजय कदम ) : पनवेल जवळील फूडलँड पेट्रोल पंप, रोडपाली येथील सिग्नल जवळून जात असलेल्या एका ट्रॅकर खाली रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटर सायकलवरील दाम्पत्य आले होते. परंतु तेथे कर्तव्यावर असलेल्या कळंबोली वाहतूक शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सतर्कमुळे त्या दोघांचा जीव बचावला आहे .
फूडलँड पेट्रोल पंप, रोडपाली येथील सिग्नल यंत्रणा विद्युत पुरवठा अभावी बंद होती. त्यामुळे त्याठिकाणी कर्तव्यावर कळंबोली वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मोहन सुदाम मुळीक, हवलदार प्रकाश भास्कर भोरे, रवींद्र मोरे, निलेश लांगरे हे होते . दरम्यान एक ट्रॅकर सदर ठिकाणावरून जात असताना रस्तावरील खड्डे वाचवण्याच्या नादात दुचाकी वर असलेले ते दाम्पत्य त्या ट्रँकर खाली आले . हा अपघात झाल्याचे बघताच त्यांचा जीव वाचवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी तेथे धाव घेतली व ट्रँकर ला थांबवून या दोघांना सुखरूप बाहेर काढले . यावेळी सदर महिलेला थोडक्यात खरचटले आहे . आपला जीव बचावल्याचे पाहून या दाम्पत्याने कळंबोली वाहतूक शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत .
फोटो - अपघात ग्रस्त ट्रॅकर