बेकायदेशीररित्या अग्निशस्त्रासह जिवंत राउंड बाळगल्याप्रकरणी दोघेजण कामोठे पोलिसांच्या ताब्यात..
दोघेजण कामोठे पोलिसांच्या ताब्यात..

पनवेल / दि २९ (संजय कदम) :  मानसरोवर रेल्वे स्टेशन परिसरात बेकायदेशीररित्या अग्निशस्त्रासह जिवंत राउंड जवळ बाळगल्याप्रकरणी दोघाजणांना कामोठे पोलिसांनी ताब्यात  घेतले असून त्यांच्या अटकेमुळे सणासुदीच्या दिवसात ते कशासाठी या ठिकाणी वावरत होते याचा लवकरच उलगडा होण्याची शक्यता आहे. 
                    आरोपी अनिल गायकवाड (२९) रा. ऐरोली, व त्याचा सहकारी अर्जुन विश्वकर्मा (२९) या दोघांजवळ गावठी बनावटीचे लोखंडी धातूचे सिल्वर कलर चे (पिस्टल) व जिवंत राउंड जवळ बाळगून ते  मानसरोवर रेल्वे स्टेशन परिसरात बेकायदेशीररित्या फिरत असल्याची माहिती बातमीदाराकडून कामोठे पोलीस ठाण्याच्या वपोनि स्मिता जाधव यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण राऊत, पोशी विजय श्रीनामे व त्यांच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतले असता त्यांच्या जवळ अडीच लाख रुपये किमतीचे अग्निशस्त्र, नऊ जिवंत काडतुसे, दोन मोबाईल फोन व सिल्व्हर रंगाचे मॅगझीन असा मिळून दोन लाख पंच्याऐंशी रुपयाचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला असून त्यांच्या विरोधात भारतीय हत्यार कायदा १९५९ चे कलम ३, २५ सह भादवी कलम ३४ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१) १३५ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. 


फोटो : हस्तगत केलेले पिस्टल व काडतुसे
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image