पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीतर्फे होणार प्रबोधनाचा सन्मान...
पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीतर्फे होणार प्रबोधनाचा सन्मान

पनवेल/प्रतिनिधी
महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे. पनवेल तालुक्यातही वारकरी संप्रदाय मोठया प्रमाणात आहे. वारकरी संप्रदायाच्या प्रबोधनाच्या परंपरेने समृध्द व सुसंस्कृत महाराष्ट्र  घडला आहे. अशा वारकरी संप्रदायाचा सार्थ अभिमान असल्यानेच पनवेल तालुक्यात प्रबोधनाचे काम करणार्‍या प्रबोधनकारांचा सन्मान पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीतर्फे करण्यात येणार आहे. यामध्ये एक विशेष सन्मानही होणारा आहे तो म्हणजे पनवेलमधून निघणार्‍या श्री संत तुकाराम महाराज पायी दिंडीला श्री विठ्ठल निर्मल दिंडी 2022 ने प्रथम क्रमांकाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्या दिंडीचा खास सन्मान केला जाणार आहे.

सदर कार्यक्रम मंगळवार दिनांक 23 ऑगस्ट 2022 रोजी नवीन पनवेल येथील बांठिया हायस्कूलच्या सभागृहात सकाळी 10 वाजता होणार आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार बाळाराम पाटील, आमदार महेश बालदी, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 शिवराज पाटील, पनवेल उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके, काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाला मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे व पदाधिकार्‍यांनी केले आहे. 

या कार्यक्रमासाठी नवीन पनवेल येथील विठ्ठल रखमाई चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धाऊ पाटील, उपाध्यक्ष विजय म्हात्रे यांचे सहकार्य लाभत आहे.
Comments
Popular posts
नवी मुंबईत न्यूईरा हॉस्पिटलचे ‘ॲलर्जी क्लिनिक’ सुरू; १५० ॲलर्जन्स तपासणीचा घेता येणार लाभ...
Image
२४ तासाचे आत घरफोडीचे ३ आरोपी अटक करून गुन्हे शाखेने ३६ लाख किंमतीचे दागिने केले हस्तगत...
Image
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्पाइन क्लिनिक सुरू ; पाठदुखी - मणक्याच्या विकारांवर तज्ञांकडून प्रभावी उपचार..
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image