जेष्ठ नागरिक बेपत्ता ...
जेष्ठ नागरिक बेपत्ता ...
पनवेल / दि . २१ ( संजय कदम ) : पनवेल तालुक्यातील बोर्ले गाव येथे राहणारे ६४ वर्षीय जेष्ठ नागरिक हे कल्याण येथे नातेवाईकांकडे गेले असता ते अद्याप घरी न परतल्याने ते हरवल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली . 
                    हरिश्चंद  गायकवाड  वय (६४), उंची पाच फूट , रंग सावळा , केस काळे - पांढरे, उजवा डोळा काळा व डावा डोळा अंध आहे , बांधा सडपातळ असून अंगात  रंगीबेरंगी फुलांचा शर्ट व काळी फुल पॅन्ट , हातातील बोटात पिवळ्या धातूची अंगठी असून त्यांना मराठी भाषा बोलता येते . या बाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल तालुका पोलीस ठाणे फोन नंबर ०२२-२७४५२४४४ किंवा पोहवा धनाजी तांडेल यांच्याशी संपर्क साधावा . 
फोटो -  हरिश्चंद  गायकवाड
Comments