एकविरा कला संस्था व दिग्दर्शक, गायक तेजस पाटील यांच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन..
सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन..

पनवेल दि . ०५, ( वार्ताहर ) :   एकविरा कला संस्था (पनवेल रायगड) या संस्थेने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी आग्रही मागणी नेहमी सातत्याने केली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव मिळावे यासाठी नेहमी आंदोलन उपोषणामध्ये एकविरा कला संस्था सहभागी झाली आहे. 
                          लोकनेते दि. बा. पाटील यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी व दि बा पाटील यांच्या विचारांची संस्कृती जपण्यासाठी एकविरा कला संस्था (पनवेल रायगड ) या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून रविवार दि.7 ऑगस्ट 2022 रोजी 9:30 वाजता आगरी समाज मंगल कार्यालय, गणेश मंदिर शेजारी, कामोठे गाव, नवी मुंबई येथे 'दिबा साहेबांना सांस्कृतिक आदरांजली' या नावाने अभंग स्पर्धा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

सादरीकरण कालावधी 1 ते 5 मिनिटाचा आहे,शिवाय विविध मान्यवरांचा दिबांचा योध्दा म्हणून विशेष सत्कार करण्यात येणार आहे.मराठी इंडियन आयडल विजेता सागर म्हात्रे याचा विशेष नागरीसत्कार होणार आहे तरी स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी अविनाश पाटील 9930010422, 
मिलिंद कडू - 8080934938,  
यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन एकविरा कला संस्था ( पनवेल रायगड) चे संस्थापक तथा अध्यक्ष तेजस पाटील यांनी केले आहे.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या देवद शाखेतर्फे आषाढी एकादशी निमित्त भाविकांना तुळशी रोपांचे वाटप...
Image