स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबांचा सत्कार करून पनवेल तालुका पोलिसांनी जपली सामाजिक बांधिलकी..
पोलिसांनी जपली सामाजिक बांधिलकी

पनवेल, दि.16 (संजय कदम) ः नेहमीची गुन्हेगारी, अपघात, कौटुंबिक वाद व इतर गुन्ह्यांच्या तपासामध्ये अडकलेल्या पोलीस खात्यामध्ये माणुुसकी व सामाजिक बांधिलकीची सुद्धा जाण असते याचा प्रत्यय आज येवून पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि रवींद्र दौंडकर यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने पनवेल परिसरात असलेल्या एका स्वातंत्र्य सैनिकाच्या कुटुंबियांच्या घरी जावून त्यांच्या पत्नीचा सत्कार करून एक वेगळा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे.

पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीत राहणार्‍या स्वातंत्र्य सैनिक कै.सुदामराव दिक्षित यांच्या कुटुंबातील सदस्यांना पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि रवींद्र दौंडकर व त्यांच्या सहकार्‍यांनी त्यांच्या राहते घरी जाऊन भेट घेतली. स्वातंत्र सैनिक कै. सुदामराव बाळाभाऊ दीक्षित यांचा जन्म 1909 मध्ये  महाराष्ट्र राज्यातील हिंगोली या गावात अतिशय गरीब परिवारात जन्म झाला असून त्यांनी मॅट्रिक पर्यंत शिक्षण आपल्या गावातच पूर्ण केलं व पुढील शिक्षणासाठी स्वबळावर पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून बीए आणि एल एल बी पदवी घेतली. एकीकडे कायद्याचा अभ्यास चालू असतानाच त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घ्यायला सुरुवात केली व कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी स्वतःला संपूर्णपणे देशाच्या स्वातंत्र्यासाठी वाहून घेतले. त्यांनी मिठाचा सत्याग्रह 1928-29, चलेजाव आंदोलन 1942, इत्यादी चळवळीमध्ये भाग घेतला होता. त्यामुळे त्यांना अनेक वेळा नांदेड, औरंगाबाद नागपूर अशा विविध ठिकाणी तुरुंगवास देखील भोगावा लागला. अशा या स्वातंत्र्य सैनिक यांच्या पत्नी श्रीमती. मैनाबाई सुदामराव दीक्षित वय.97 वर्षे व त्यांची मुलगी श्रीमती. आशा सुदामराव दीक्षित हे तालुका हद्दीतील कोन गाव येथील इंडिया बुल्स ग्रीन सोसायटी येथे राहत असल्याने त्या ठिकाणी जावून त्यांच्या पत्नीचे वपोनि रवींद्र  दौंडकर यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ त्यांना देवून त्यांचा सत्कार केला व आगळ्या वेगळ्या पद्धतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला.


फोटो ः मैनाबाई दिक्षित यांचा सत्कार करताना वपोनि रवींद्र दौंडकर व सहकारी.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image