राजिप आदई शाळेतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रॅली...
राजिप आदई शाळेतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रॅली...

पनवेल/प्रतिनिधी
देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. सर्व शाळांमधूनही हा अमृत महोत्सव मोठया उत्साहात साजरा होताना दिसत आहे. त्यासाठी शाळा नवीन नवीन उपक्रम राबवत आहे. राजिप शाळा आदई तर्फेही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांनी रॅली काढली होती. यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात झेंडा होता आणि ही रॅली आदई गावामध्ये फिरवण्यात आली. यावेळी विद्यार्थ्याच्या घोषणांनी परिसरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी मेहनत घेतली.
Comments