अंमली पदार्थ विक्री करताना नायजेरियन इसमाला अटक ; 8.62 लाखांचा एमडी (मेफेड्राॅन) हस्तगत ...
8.62 लाखांचा एमडी (मेफेड्राॅन) हस्तगत ...
पनवेल दि.२६ (संजय कदम) : तळोजा परिसरातून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या एका नायजेरियन इसमाला अटक करून त्याच्याकडून 57.50 ग्रॅम वजनाचा एकुण 8,62,000/रू चा एमडी (मेफेड्राॅन) हस्तगत केला आहे.
  पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह, सह पोलीस आयुक्त डॉ ‌ जय जाधव, परि. 2 पनवेल पोलीस उप आयुक्त शिवराज पाटील, पनवेल विभागाचे सहा पोलीस आयुक्त भागवत सोनवणे यांचे पनवेल व नवी मुंबई शहर नशामुक्त करण्याचे उद्देशाने अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इसमांविरूध्द कडक कारवाई करण्याचे स्थायी आदेश आहेत. त्यानुसार एक नायजेरियन इसम तळोजा फेज 1 शंकर मंदिराचे मागे एमडी हा अंमलीपदार्थ विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांना मिळताच त्यांच्यासह सपोनि पारासुर, पोउपनि नरेंद्र पाटील व पोहवा सुरेश चौगुले, पोहवा दिपक पाटील,पोना विक्रम राऊत, पोना हरिदास करडे, पोना चंदेवाड, पोना विजय पाटील, पोशि संदेश उत्तेकर, पोशि नितीन गायकवाड, मपोशि प्रतिभा काटे आदींची दोन पदके तयार करून शंकर मंदिराचे मागील रस्त्यावर तळोजा फेज 1 येथे रात्रो दोन पंचांचे समक्ष सापळा लावून थांबले. त्यादरम्यान सदर ठिकाणी एक नायजेरियन इसम संशयितरित्या घुटमळताना दिसून आला. त्यास पथकाचे मदतीने ताब्यात घेऊन त्यांची पंचांचे समक्ष झडती घेतली असता सदर इसमांकडे एकूण 57.50 ग्रॅम वजनाचा एकुण 8,62,000/रू चा एमडी (मेफेड्राॅन) हा अंमली पदार्थ मिळून आला आहे. सदर नायजेरियन इसमास ताब्यात घेतले. त्याचे नाव अँनथोनी नैईमेका ओकोली वय-36 वर्षं, धंदा- कपडे विक्री, रा- सेक्टर 36 खारघर, मुळ रा - ओनिस्था, नायजेरिया असे समजले व त्याच्याकडून 
8,62,000/ रू किमतीचे दोन वेगवेगळ्या पारदर्शक प्लास्टिकच्या पिशवीमध्ये अनुक्रमे 40.50 ग्रॅम वजनाचा व 17.00 ग्राम वजनाची भुरकट रंगाची लहान खडे मिश्रित पावडर एमडी (मेफेड्राॅन) व 1000/ रू 500 रू दराच्या दोन भारतीय चलनाची नोटा असा एकूण ₹ 8,63,000/रू चा वरील प्रमाणे मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा  तपास सपोनि सुनील गुरव हे करीत आहेत.
फोटो : अंमली पदार्थ विक्री करताना नायजेरियन इसमाला अटक
Comments