मे.दिलीप वेंगसरकर फाऊंडेशनशी करार...
पनवेल,/ दि.1 : पनवेल क्षेत्रातील अनेक मुलांमध्ये क्रिकेटचे टॅलेंट आहे. परंतू त्यांना व्यासपीठ नाही, पनवेल महापालिकेमुळे हे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. भविष्यात येथील मुलेही भारतीय क्रिकेट टिममध्ये खेळू शकतील, असा विश्वास विख्यात क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले.
महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती-ब, प्रभाग क्र.16 मधील भुखंड क्र. 28, सेक्टर – 11, नवीन पनवेल (पूर्व) येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र (अकॅडमी) पनवेल महापालिकेच्यावतीने लवकरच उभारण्यात येणार आहे. या प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण देण्यासाठी मे.दिलीप वेंगसरकर फाऊंडेशनशी करारआज(1 जुलै) आयुक्त दालना शेजारील बैठक कक्षात करण्यात आला. यावेळी दिलीप वेंगसरकर, महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, वृषाली वाघमारे, राजश्री वावेकर, प्रवीण पाटील, अनिल भगत,आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त सचिन पवार, शहर अभियंता संजय जगताप, कार्यकारी अभियंता संजय कटेकर आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सभागृह नेते परेश ठाकूर म्हणाले, युवकांसाठी शिक्षण,आरोग्य आणि क्रिडा यामध्ये महापालिका काम करत आहे. विविध क्रिडा संकुले आम्ही बांधत आहोत. महापालिका क्षेत्रात उद्याने मैदाने विकसित करत आहोत याठिकाणी बँडमिंटन प्रशिक्षण देणार आहोत. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देणारी संस्था असावी या विचाराने नवीन पनवेल येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र उभारत आहोत. प्रसिध्द किक्रेटपटू दिलीप वेंगसरकर यांच्या संस्थेची निवड यासाठी करण्यात आली आहे.
आयुक्त गणेश देशमुख म्हणाले, पनवेल महानगरपालिका विविध क्षेत्रात विकास कार्यक्रम राबविले जात आहेत. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, वॉर्ड ऑफीसेस याच्या बरोबरीने महापालिका क्षेत्रातील नागरिकांचे आरोग्य तंदुरूस्त रहावे या विचाराने आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रिकेट अकॅडमी उभारण्यात येणार आहे. या पालिकेतील विद्यार्थी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळावे या हेतूने दिलीप वेंगसरकर यांच्या अकॅडमीची निवड करण्यात आली आहे.
पनवेल शहर आणि तालुक्यातील किक्रेटवीरांसाठी प्रशिक्षण घेण्यासाठी मुंबई व इतरत्र जावे लागत होते. महापालिका उभारत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्रामुळे नागरिकांची ही अडचण दूर होणार आहे. या प्रशिक्षण केंद्रामध्ये विख्यात किक्रेटपटू दिलीप वेंगसर यांचे मार्गदर्शन क्रिकेटपटूना मिळणार आहे. यासाठी मे. दिलीप वेंगसरकर फाऊंडेशनशी महापालिकेलेने करार केला आहे. या प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रत्येक वर्षी 10 ते 19 वयोगटातील किमान 101 विद्यार्थांना विनामुल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामधील पन्नास टक्के पमपा क्षेत्रातील, पंचवीस टक्के रायगड जिल्ह्यातील विद्यार्थी आणि पंचवीस टक्के महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील विद्यार्थी असणार आहेत.
चौकट
कामाचे अंदाजित खर्च – रक्कम रु. 8,84,30,810/-
भुखंडाचे क्षेत्रफळ – 29,899 चौ. मी.(7.47 एकर)
कामाचे स्वरुप – 150 मी. व्यासाचे क्रिकेट मैदान, पॅव्हेलियन इमारत
प्रशिक्षण केंद्र व – 421 चौ. मी. (4529.96 चौ फुट )
पॅव्हेलियन इमारत क्षेत्रफळ
वाहनतळ क्षमता – 31 चार चाकी वाहने, 40 दु-चाकी वाहने व 2 बस
प्रशिक्षण संस्था – मे. दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन