सराईत सायकल चोरट्यास पनवेल शहर पोलिसानी घेतले ताब्यात ; हजारो रुपये किमतीच्या सायकली हस्तगत
हजारो रुपये किमतीच्या सायकली हस्तगत  

पनवेल दि. ०६ ( संजय कदम ) : पनवेल शहर परिसरात उभ्या ठेवलेल्या सायकली चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसानी ताब्यात घेतले असून त्याच्या कडून हजारो रुपये किमतीच्या सायकली हस्तगत केल्या आहेत . 
                            पनवेल शहर परिसरात गेल्या काही महिन्या पासून सायकल चोरी जाण्याचे प्रमाण वाढले होते या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि अभयसिंह शिंदे, पोहवा  रविंद्र राऊत, पोना परेश म्हात्रे, पोना महेंद्र वायकर, पोना विनोद देशमुख, पोना रविंद्र पारधी, पोशि विवेक पारासुर, पोशि प्रसाद घरत  आदींच्या पथकाने सदर आरोपीचा शोध घेत असताना सराईत सायकल चोर दिनेश रामदास जाधव, वय 35 वर्षे, धंदा हमाल काम, रा. कोळीवाडा, पनवेल याची माहिती मिळाली त्या नुसार सापळा रचून सदर आरोपीला ताब्यात घेतले असता त्याने पनवेल परिसरातून चोरलेल्या २५ पेक्षा जास्त हजारो रुपये किमतीच्या अत्याधुनिक व जुन्या सायकली ताब्यात घेण्यात आल्या आहेत . 
कोट -  पनवेल शहर पोलिसानी २५ पेक्षा जास्त चोरीच्या सायकली हस्तगत केल्या आहेत , तरी ज्यांच्या सायकली चोरीस गेल्या असतील त्यांनी आवश्यक ती कागदपत्रे आणून सायकलींची ओळख पटवून घ्यावी - वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने
फोटो - हस्तगत केलेल्या सायकली
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image