पांडवकडा धबधबा पर्यटकांसाठी यंदाही बंद..
पांडवकडा धबधबा पर्यटकांसाठी यंदाही बंद
पनवेल दि.०४(वार्ताहर) : खारघरमधील पांडवकडा धबधबा पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आला आहे. मात्र, पर्यटकांचा अतिउत्साहीपणा हा त्यांच्याच जिवावर बेतत असल्याचे अनेक वेळा पाहावयास मिळते. यामुळेच वन विभागाने धबधब्यावर पांडवकडा पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, तर पनवेलमधील इतर पर्यटस्थळाबाबत सोमवारच्या बैठकीत निर्णय होणार आहे. वन विभागाच्या या निर्णयामुळे पर्यटकांचा हिरमोड होणार आहे..
खारघर शहराला नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला पांडवकडा धबधबा हादेखील शहराला ओळख प्राप्त करून देणारे पर्यटनस्थळ बनले आहे. दरवर्षी हजारोंच्या संख्येने पर्यटक या गेलेला आहे. धबधब्याला भेट देत असतात. मात्र, काही हौशी पर्यटक वन विभागाने घातलेली बंदी झुगारून आततायीपणा करत असतात. त्यामुळे काहींना आपला जीवदेखील गमवावा लागला आहे. आजवर याठिकाणी बळी गेलेल्या पर्यटकांचा आकडा शेकडोच्या वर गेलेला आहे ठाणे, कल्याण, मुंबई, उपनगर, रायगड आदी ठिकाणांहून पर्यटक याठिकाणी येत असतात. दरवर्षी वन विभाग पर्यटकांना याठिकाणी प्रवेशबंदी असल्याचे बोर्ड लावत असते. यावर्षीदेखील या कामाला सुरुवात आहे. झाली आहे. दर्शनी भागात पर्यटकांना सध्या शह प्रवेशबंदी असल्याचे सूचना फलक आम्ही लावणार आहोत, असे वन नियमांचे विभागाचे वरिष्ठ अधिकारी डी.एस.सोनवणे यांनी सांगितले. परवानगीशिवाय वन हद्दीत प्रवेश करणे हा कायद्याने गुन्हा आहे.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image