ब्रह्मचैतन्य संगीत सभेत अजय रिसबुड यांचे गायन...

'सूर निरागस हो' या संगीतप्रेमी समूहाच्या वतीने आयोजित ब्रह्मचैतन्य मासिक संगीत सभेचे सातवे पुष्प संपन्न ...

पनवेल  / प्रतिनिधी पनवेल येथील "सूर निरागस हो" या संगीतप्रेमी समूहाच्या वतीने आयोजित ब्रह्मचैतन्य मासिक संगीत सभेचे सातवे पुष्प संपन्न झाले. गोंदवलेकर महाराज साधना केंद्रामधे संपन्न झालेल्या या संगीत सभेमधे मुलुंड येथील प्रसिद्ध शास्त्रीय गायक अजय रिसबुड यांचे गायन संपन्न झाले. या कार्यक्रमाला प्रा. अंबादास देशमुखगायिका वैशाली कुलकर्णीचंद्रकांत ताह्मनकर आदी मान्यवरांसह संगीतप्रेमींची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.  

             पं.अरुण कशाळकर यांचे शिष्य असलेल्या अजय रिसबुड यांनी मैफिलीची सुरवात आग्रा घराणेची खासियत म्हणजे नोमतोम या सादरीकरणाने केली. प्रारंभी ''श्री'' हा गंभीर राग आळवून शास्त्रीय संगीताचे प्रसन्न वातावरण निर्माण केले. त्यानंतर राग केदार रागातील एक बंदिश पेश केली. नंतर स्वतः संगीतबद्ध केलेला विठ्ठलभक्तीपर अभंग आणि 'वाजे वृंदावनी वेणूव 'आम्हा न कळे ज्ञानया रचना सादर केल्या. 

त्यांना अथर्व देव यांनी संवादिनीगणेश घाणेकर यानी तबलाविशाल जोगळेकर यानी पखवाज व समीर सोमण यानी तालवाद्यांची साथ केली. 

Comments