केशव स्मृती पतपेढीच्या संचालक पदी अविनाश कोळी यांची बिनविरोध निवड..
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाने केले अभिनंदन

पनवेल  : -  नुकत्याच पनवेल येथील सुप्रसिद्ध अशा केशवस्मृती नागरी सहकारी पतपेढीची निवडणुक प्रक्रिया पार पडली. यामध्ये अध्यक्ष अमित ओझे यांच्या नेतृत्वाखालील पॅनल बिनविरोध निवडून आले. पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे सन्माननीय सदस्य अविनाश कोळी यांची पतपेढीच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
     संचालक पदी नियुक्ती झाल्याबद्दल पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या वतीने अविनाश कोळी यांचे बुधवार दिनांक ८ जून रोजी अभिनंदन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांनी शाल, पुष्पगुच्छ, श्री साईबाबांची मूर्ती आणि पुस्तक भेट देऊन अविनाश कोळी यांचे अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मंचाचे सरचिटणीस मंदार दोंदे, खजिनदार नितीन कोळी, पत्रकार विवेक मोरेश्वर पाटील, संजय कदम, भरत कुमार कांबळे, योगेश पाटील आदी सदस्य उपस्थित होते.
Comments