अलिबाग एसटी डेपोचे व्यवस्थापक व कर्मचार्‍यांचा प्रवासी वर्गाकडून सत्कार..
कर्मचार्‍यांचा प्रवासी वर्गाकडून सत्कार
अलिबाग/प्रतिनिधी
राज्यामध्ये एसटीचा संप सुरु असताना अलिबाग डेपो व्यवस्थापक अभिजीत मांढरे आणि कर्मचारी यांनी एसटी सेवा सुरळीतपणे देवून प्रवाशांची गैरसोय होवू दिली नाही. या सेवेबद्दल त्यांचा अलिबाग बस स्थानकात सत्कार करण्यात आला. 
यावेळी जिल्हा न्यायालयीन पनवेल कर्मचारी व मतीन अधिकारी, तसेच प्रवासी दिनेश पावशे, चव्हाण, सोनकर, वरसोलकर, पाटील, कुलकर्णी, वर्तक, दांडेकर आदी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते अलिबाग एसटी डेपोचे व्यवस्थापक अभिजीत मांढरे व कर्मचारी यांचा शाल, पुषपगुच्छ आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला

एसटीचा संप सुरू असताना अलिबाग एसटी डेपोचे व्यवस्थापक आणि एसटीचे कर्मचारी यांनी आपली सेवा सुरळीत सुरू ठेवली होती, त्यामुळे अलिबाग हून इतर ठिकाणी शासकीय कर्मचारी, कामगार वर्ग यांना कामावर पोहोचण्यासाठी विशेष मदत झाली. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांचा प्रवाशांनी सत्कार केला. सत्काराच्या वेळी विशेष उपस्थिती दर्शवून एसटी डेपोचे अधिकारी तसेच कर्मचारी यांचे विशेष आभार मानले. एसटी कर्मचार्‍यांनी एसटी संपामध्ये केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
Comments