पनवेल हेड पोस्ट ऑफिस सकाळी ८ ते रात्री ८ नागरिकांच्या सेवेत...
पनवेल हेड पोस्ट ऑफिस सकाळी ८ ते रात्री ८ नागरिकांच्या सेवेत...
पनवेल / प्रतिनिधी : - भारतीय डाक विभागाच्या नागरिक केंद्रित दृष्टिकोनाचा एक भाग म्हणून आणि ग्राहकांच्या सोईसाठी नवी मुंबई पोस्टल रीजनने निवडक पोस्ट ऑफिस मधे विशेष काऊंटर द्वारे सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत सर्व मेल आणि बँकिंग सेवा प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पनवेल मुख्य डाकघर येथे दिनांक ०५ मे २०२२ पासून सकाळी  ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत मेल‌ व  बॅंकीग सेवा देण्यासाठी विशेष काऊंटर सुरू करण्यात आले आहे.

या विस्तारित काउंटर वेळेचा उपयोग ग्राहकांना कार्यालयीन वेळेनंतर मेल पोस्ट करण्यासाठी देखील होईल. सध्याच्या कर्मचार्‍यांच्या कार्यालयीन वेळा समायोजित करून हे व्यवस्थापन केले जात आहे. पनवेल हेड पोस्ट ऑफिस प्रमाणेच ठाणे, कल्याण, मीरा रोड आणि प्रदेशातील इतर  काही  टपाल कार्यालये सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत सेवा येणा-या कालावधीत प्रदान करणार आहेत.

शहरातील जे नागरिक कामाच्या निमित्ताने सकाळी लवकर निघतात आणि उशिरा घरी परततात, विशेषत: नवी मुंबई आणि ठाणे- कल्याण येथे राहणारे पण कामासाठी मुंबई शहरात प्रवास करणाऱ्या नोकरदार वर्गास याचा निश्चितच फायदा होईल अशी अपेक्षा नवी मुंबई क्षेत्रातील पोस्ट मास्तर जनरल गणेश व्ही. सावळेश्वरकर यांनी सा.पनवेल वैभवशी बोलताना व्यक्त केली.

Comments