एस टी महामंडळाच्या बस ला शॉर्ट सर्किटमुळे कर्नाळा अभयारण्य येथे लागली आग..
कर्नाळा अभयारण्य येथे लागली आग..

पनवेल / वार्ताहर : - पनवेल तालुका पो.ठाणे हद्दीत आज रोजी सकाळी 09:15 वा.सु.मुंबई- गोवा हायवे रोडवर  एस टी महामंडळाची बस नं. MH-14 BT- 2056 ही कर्नाळा अभयारण्य येथे आले वेळी अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याची घटना घडली आहे.

सदर बस मध्ये 52 प्रवासी प्रवास करीत होते,  आग फायर ब्रिगेडने पूर्णपणे विझवली आहे.सदर घटनेमध्ये कोणीही प्रवासी जखमी नाही. वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे.
Comments