'' विजयी भव '' चित्रपट २० मे रोजी होणार प्रदर्शित...
अभिनेत्री नयन पवार पाटलींन बाईंच्या भूमिकेत

पनवेल वैभववृत्त सेवा : -  आजवर राजकारण खेळावर आधारित बरेच चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. काही चित्रपटात  केवळ खेळ तर काही मध्ये फक्त राजकारण दाखविण्यात आले आहे. आता मात्र एक असा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्यात राजकारण व खेळ यांची अचूक सांगड घालण्यात आली आहे. 'विजयी भव' हा चित्रपट मागील काही दिवसांपासून रसिक तसेच सिनेसृष्टी पर्यंत सर्वत्र चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या विजयीभव या चित्रपटाच्या ट्रेलरने रसिकांची उत्सुकता शिगेला पोहचण्याचे काम केले आहे. अत्यंत कमी वेळेत 'विजय भव'चा ट्रेलर लाखो रसिकांपर्यंत पोहोचला आहे. या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार आहे याची प्रतीक्षा आता संपली असून 20 मे रोजी विजयी भव हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.  

विजयी भव या चित्रपटाची निर्मिती किर्तन गोवर्धन पटेल यांनी केली आहे तर दिग्दर्शन शैलेश पाटील व अतुल सोनार या जोडगोळीने केले आहे. तर या चित्रपटाची कथा मुकुंद महाले यांनी लिहिली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री नयन पवार यांची या चित्रपटात पाटलींन बाईची महत्वाची भूमिका असणार आहे.  चित्रपटाची कथा पळसखेडा गावाभोवती गुंफण्यात आली आहे. त्या गावात दर पाच वर्षांनी नवीन सरपंचांची निवड करण्यासाठी कबड्डी सामने खेळवले जातात. सरपंच पदासाठी उभ्या असलेल्या त्याच्या उमेदवारांचा संघ विजय होतो. त्याच्या गळ्यात सरपंच पदाची माळ पडते. राजकारण म्हटलं की कट कारस्थान, डावपेच, सूडभावना आलेच. या सर्वांची अचूक सांगड घालण्यात आली आहे. कबड्डी सारख्या अस्सल लाल मातीतील खेळाशी राजकारणाची जोड देऊन हा चित्रपट निर्मिती करण्यात आला आहे.                           प्रेक्षकांनी चित्रपट गृहात येऊन हा चित्रपट पहावा, अशी विनंती या चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेत्री नयन पवार यांनी केली आहे.
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image