पनवेलच्या गांधी हॉस्पिटलमध्ये नवी मुंबईतील पहिली अजूरिऑन फिलिप्स कॅथलॅब, फिलिप्स डिजीटल एम.आर.आय.व तोशीबा कॅनॉन ३२ स्लाईस सी.टी. स्कॅन मशिन दाखल..
पनवेलच्या गांधी हॉस्पिटलमध्ये नवी मुंबईतील पहिली अजूरिऑन फिलिप्स कॅथलॅब, फिलिप्स डिजीटल एम.आर.आय.व तोशीबा कॅनॉन ३२ स्लाईस सी.टी. स्कॅन मशिन दाखल

पनवेल दि.०९ (संजय कदम) : पनवेलसह नवी मुंबईतील पहिली अजूरिऑन फिलिप्स कॅथलॅब, फिलिप्स डिजीटल एम. आर. आय. व तोशीबा कॅनॉन ३२ स्लाईस सी.टी. स्कॅन मशिन पनवेल येथील गांधी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली असून येत्या १० एप्रिल २०२२ पासून जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे.  

      यावेळी आ. प्रशांत ठाकूर, आ.बाळाराम पाटील, महापौर डॉ.कविता चौतमोल, आयुक्त गणेश देशमुख, सभागृहनेते परेश ठाकूर, विरोधीपक्षनेते प्रितम म्हात्रे, कॉंग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत व शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबन पाटील यांच्या उपस्थितीत याचे उद्घाटन होणार असल्याची माहिती डॉ.प्रमोद गांधी यांनी दिली. यावेळी बोलताना डॉ. प्रमोद गांधी यांनी सांगितले की, ‘अजूरिऑन कॅथलॅबची वैशिष्ट्ये म्हणजे हार्ट अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, स्टेंट बूस्ट लाईव्ह, कार्डियाक स्विंग, डायनामिक करोनरी रोड मॅप, ब्रेन डी.एस.ए. स्टेन्टींग, कॉइलिंग पेरिफेरल अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी मोस्ट अॅडव्हान्सड कॅथलॅब इन नवी मुंबई लोएस्ट रेडिएशन एक्सपोजर हे असणार आहे तर डिजिटल फिलिप्स एम. आर. आय. ची वैशिष्ट्ये ही संपूर्ण बॉडी एम. आर. आय, न्यूरो इमेजिंग, पेटस एम. आर. आय., मेटल आर्टिफॅक्ट रिडक्शन एम. आर. आय., एम. आर. आय. ब्रेस्ट मॅमोग्राफी., कार्डियाक एम. आर. आय., मुस्क्युलोस्केलेटल एम. आर. आय., औंको  एम. आर. आय., रिनल इनसफिशियन्सी पेशंट फ्रेंडली एम.आर.आय., कमीत कमी एकॉस्टिक साउंड, डिजीटल क्लरिटी, फास्ट एम. आर. आय आहे. तसेच तोशीबा कॅनॉन सी.टी. स्कॅनची वैशिष्ट्ये ही ३२ स्लाईस, मेटल आटिफॅक्ट रिडक्शन सिक्किन्स, सी.टी. गायडेड बायोप्सी, लंग व्हॉल्यूम अॅनालिसिस, आयोडिन मॅपिंग, व्हरच्युअल एन्डोस्कोपी अशी आहेत. यासाठी कॅथलॅब टीम म्हणून डॉ. अविनाश गुठे (कार्डिओलॉजिस्ट), डॉ. ऋषीकेश ठाकूर (कार्डिओलॉजिस्ट), डॉ. सागर तांडेल. (कार्डिओलॉजिस्ट), डॉ. केशव काळे (कार्डिओलॉजिस्ट), डॉ. अनुज साठे (कार्डिओलॉजिस्ट), डॉ. मुग्धा ठाकूर (कार्डिओलॉजिस्ट) तर ब्रेन डी. एस. ए. टीम म्हणून डॉ. नीरज पटनी (न्यूरोसर्जन), डॉ. किशोर जाधव (न्यूरोलॉजिस्ट), डॉ. जयेंद्र यादव (न्यूरोलॉजिस्ट), डॉ. समीर काळे (इंटरव्हेंशनल न्यूरोसर्जन) तसेच एम. आर. आय. व सी.टी. स्कॅन टीम म्हणून डॉ. प्रतीक पाटील (रेडिओलॉजिस्ट), डॉ. सुशील पाटील (इंटरव्हेंशनल रेडिओलॉजिस्ट), डॉ. अक्षय गुरसाळे (इंटरव्हेंशनल रेडिओलॉजिस्ट) हे काम पाहणार असल्याची माहिती यांनी दिली.

फोटो : नवीन उपकरणांची माहिती देताना डॉ.प्रमोद गांधी
Comments