एसटी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सभा उत्‍साहात संपन्न..
एसटी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सभा उत्‍साहात संपन्न
पनवेल (वार्ताहर):
पनवेल-उरण एसटी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सभा नुकतीच पनवेल बस स्थानकात चंद्रकांत आनंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, सभेला ८८ सेवानिवृत्त एसटी कर्मचारी उपस्थित होते. प्रथम मृत पावलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली, त्यानंतर सर्व निवृत्त उपस्थित कर्मचाऱ्यांचे संघटने मार्फत स्वागत करण्यात आले. उपाध्यक्ष एन.ए. चव्हाण यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की सध्या अस्तित्वात असलेली कमिटीच २०२२ पर्यंत कार्यरत राहील, तसा प्रस्ताव त्‍यांनी मांडला. त्या प्रस्तावा बाबत बी. बी. पाटील यांनी सर्वांची मते जाणून घेतली. सेवानिवृत्त सर्व कर्मचाऱ्यांनी त्या प्रस्तावास एक मताने संमती देत प्रस्ताव स्वीकारला, प्रस्‍तावाला कुठलाही विरोध करण्यात आला नाही.  संघटनेचे सल्लागार ॲड. विद्याधर मोकल यांनी नवीन सभासदांची नोंदणी करून घेतली, त्यावेळी सर्वांनी एकोप्याने राहून संघटनेला सहकार्य करण्याचे ठरले. त्‍याचप्रमाणे सभा खेळीमेळीच्या व उत्‍साहाच्या वातावरणात पार पडली. 
यावेळी सी. आर. काळे, एच. आर. नाईक, गिरीश ठाणगे, मधुकर शिंदे, श्रीमती शैला पितळे, श्रीमती सीमा देशमुख, के. पी. म्‍हात्रे, सौ. आशा विलवर्ण, सौ. येराडकर, प्रकाश लाखण, अनिल झिराडकर, ए. एम. चौधरी, एस. एस. शिंदे, एस. के. म्‍हात्रे, एस. बी. सावळकर, तुकाराम पाटील, के. एस. पाटील, नितीन वेदक, एकनाथ पाटील, राहुल सोनावणे आदी उपस्‍थित होते.
Comments