अज्ञात वाहनाच्या धडकेने इसमाचा मृत्यू...
अज्ञात वाहनाच्या धडकेने इसमाचा मृत्यू

पनवेल दि.१८ (वार्ताहर) :  अज्ञात वाहनाच्या धडकेने एका इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पनवेल जवळील टीपॉइंट येथे पळस्पे फाटा ते जेएनपीटी लेनच्या ब्रिज उतरतेवेळी घडली आहे. 
सचिन सावंत (वय ३६) राहणार खारघर असे या व्यक्तीचे नाव असून अज्ञात वाहनावरील चालकाने त्यांच्या स्कूटीगाडीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत अज्ञात वाहकाविरोधात पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments