मोटरसायकल चोरी करणा-या २ आरोपींना गुन्हे शाखा कक्ष २, पनवेलकडून अटक..


एकूण ५ गुन्हयांची उकल..
पनवेल : -  गुन्हे शाखा कक्ष २, पनवेल, पोलीस आयुक्तालय, नवी मुंबई पार्क केलेल्या मोटर सायकल चोरी करून नेणा-या गुन्हयातील पाहिजे आरोपी गुन्हे शाखा कक्ष २, पनवेल यांच्याकडून अटक केली असून  एकुण ०५ गुन्हयांची उकल करण्यात आली आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत दुचाकी वाहनांचे चोरीचे प्रमाण वाढल्याने गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशिर माहिती प्रमाणे अशा प्रकारे दुचाकी वाहने चोरी करणारे दोन आरोपी नवी मुंबई वाशी येथे येणार असल्याबाबत माहिती मिळाल्याने वरिष्ठांना अवगत करून वरिष्ठांचे आदेशाप्रमाणे सापळा लावून मोटर स्कुटी विक्री करण्यासाठी आलेले दोन आरोपींना अटक करून त्यांचेकडुन एकुण ३,६५,०००/ रूपये किमतीच्या ०५ मोटर स्कुटी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

मागील दोन वर्षांपासून नवी मुंबईत सार्वजनिक ठिकाणी पार्क करण्यात येणारी दुचाकी वाहने चोरीस जाण्याचे प्रमाणे वाढल्याने अशा प्रकारे गुन्हे करणारे आरोपींचा शोध घेवून वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणन्याबाबत मा.पोलीस आयुक्त सो. बिपीन कुमार सिंह, मा. अपर पोलीस आयुक्त सो. महेश घुर्ये, मा. पोलीस उप आयुक्त सो. सुरेश मेंगडे यांनी वाहन चोरीच्या गुन्हयातील आरोपींचा तात्काळ शोध घेवून गुन्हा उघडकीस आणन्याबाबत आदेशीत केल्याने नमुद गुन्हयांचा तपास मा सहाय्यक पोलीस आयुक्त सो विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गिरीधर गोरे व त्यांच्या टिमने गोपनिय माहिती व तांत्रिक बाबींचा तपास करून गुन्हयातील पाहिजे आरोपी हे त्यांचेकडे असलेली चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी वाशी नवी मुंबई येथे येणार असल्याबाबत माहिती मिळाल्याने सपोनि. फडतरे व पोलीस पथकाने सदर ठिकाणी सापळा लावून मोटर स्कुटी विक्री करण्यासाठी आलेले दोन आरोपींना अटक करून त्यांचेकडुन एकुण ३,६५,००० /- रुपये किंमतीच्या ०५ मोटर स्कुटी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

अटक आरोपींची नावे

१) फैजान फुरखान शेख, वय २३ वर्षे छ स्लायडींग विंडो, रा. स्लॉटर हाउस कंपाउंड, महाराष्ट्र नगर नंबर ९ रूम नंबर २०३, बांद्रा पश्चिम मुंबई ४०००५० २) मुस्तफा अब्दुल कय्युम सैय्यद, वय २२ वर्षे, व्य. शिक्षण, रा. प्लॅट नंबर २, पहिला

मजला, बीजिंग, बाजार रोड, बांद्रा पूर्व मुंबई ४०००५० नमुद अटक आरोपी यांचेकडून गुन्हे शाखा कक्ष २ यांनी एकूण ३,६५,०००/
रूपये किंमतीच्या ०५ मोटर स्कुटी हस्तगत केल्या आहेत.

सदरची उत्कृष्ट कारवाई नवी मुंबई गुन्हे शाखा कक्ष २ पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गिरीधर गोरे, सपोनि संदिप गायकवाड, सपोनि. प्रविण फडतरे, पोउपनि मानसिंग पाटील, पोउपनि वैभवकुमार रोंगे, सफौ/ सुदाम पाटील, पोहवा / १०३४ ज्ञानेश्वर वाघ, पोहवा / १३४३ मधुकर गडगे. पोहवा / ४२० सचिन पवार, पोहवा / १७३२ अनिल पाटील, पोहवा / १३३९ प्रशांत काटकर, पोहवा / १९३ रणजित पाटील, चापोहवा / १९३० राजेश बैकर, पोना/ १७९९ निलेश पाटील, पोना / २०२२ रूपेश पाटील, पोना / २०८२ इंद्रजित कानु, पोना/२००५ सचिन म्हात्रे, पोना / १७३८ दिपक डोंगरे, पोना/ ४४९३ आजिनाथ फुंदे, पोना / २३३४ प्रफुल्ल मोरे, पोना / २२५६ राहुल पवार, पोशि/ १२५९३ संजय पाटील, पोशि/ ३५७७ प्रविण भोपी, पोशि/ ४३१७ विकांत माळी यांनी केली आहे.
Comments