हिंद मराठा महासंघ कोकण प्रदेशाध्यक्षपदी निवृत्त एसीपी विनोद चव्हाण यांचा पदग्रहण सोहळा संपन्न
निवृत्त एसीपी विनोद चव्हाण यांचा पदग्रहण सोहळा संपन्न

पनवेल( प्रतिनिधि) : - हिंद मराठा महासंघ हे मराठा समाजाचे मोठे राष्ट्रीय संघटन आहे. समाजाची संघटनात्मक ताकद दिवसागणिक वाढत असून मराठा समाजाचे अनेक दिग्गज नेते महासंघात काम करण्यासाठी येत आहेत.  त्यामुळे समाजाचा सर्वांगीण विकास साधने शक्य होणार आहे. सर्वांनीच एकोप्याने आणि समन्वयाने काम करू या असे आवाहन हिंद मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष  मराठा समाजाचे जेष्ठ नेते सदानंदराव भोसले यांनी केले आहे. 
हिंद  मराठा समाजाचे नवनियुक्त कोकण प्रदेश अध्यक्ष निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त विनोदराव चव्हाण यांच्या पदग्रहण समारंभानिमित्त रविवारी सायंकाळी 6 वाजता  पनवेल येथे आयोजित कार्यक्रमामध्ये श्री. भोसले उपस्थित मराठा बांधवाना मार्गदर्शन करित होते
राज्यातील बडोदे संस्थानचे परिवारातील  हिंद मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.उज्ज्वलसिंह राजे गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. सदानंदराव भोसले यांनी मराठा समाजाच्या उकर्षासाठीच  हिंद मराठा महासंघाची स्थापना करण्यात आली असून यातूनच समाजातील अनेक दिग्गज मराठा जोडले गेले आहेत.छत्रपती शिवराय आणि राजे सयाजीराव गायकवाड यांना अभिप्रेत असलेले समाज प्रबोधनाचे कार्य हिंद मराठा महासंघाच्या माध्यमातून सुरु झाले आहे. आता समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सर्व मराठा बांधवानी एकत्र येऊन संवाद व समन्वयाने काम करूया असे भावनिक आवाहन श्री. भोसले यांनी केले आहे
कार्यक्रमाच्या प्रारंभी राजे उज्ज्वलसिंह गायकवाड यांच्या हस्ते  शिवरायांच्या पुतळ्याचे विधिवत पूजन करण्यात आले आणि पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी मराठा बांधवानी शिवराय आणि राजे सयाजीराव गायकवाड यांच्या जयजयकार च्या घोषणानि आसामंत दणाणून सोडला.
राजे उज्ज्वलसिंह राजे गायकवाड यांनी देशभरात शिवराय आणि सयाजीराव गायकवाड यांनी मराठा साम्राज्यासोबतच रयतेसाठी काम केले. त्याप्रमाणे आपणही मराठा समाजासाठी आदर्शवत काम करण्याचा प्रयत्न करू या असे आवाहन केले.यावेळी महासंघाचे राष्ट्रीय सचिव शिवाजीराव पालांडे, उद्योग व रोजगार विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. राजेंद्र आंब्रे, गुजरात राज्याचे अध्यक्ष देवेश माने,बडोदा जिल्हा अध्यक्ष श्री.प्रदीप मोरे, गुजरातचे युवा अध्यक्ष समरजितसिंह राजे गायकवाड, आमदार उद्योजक वहाळ साई संस्थान अध्यक्ष लोकनेते रवीशेठ पाटील, इंटकचे अशोकराव मोरे, जयंत म्हात्रे, आदी मान्यवर उपस्थित होते.
     
या कार्यक्रमामध्ये सहायक पोलीस आयुक्त विनोदराव चव्हाण यांची  कोकण प्रदेश अध्यक्ष पदी  नियुक्ती करण्यात आली. त्यांना संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले आणि राष्ट्रीय अध्यक्ष उज्ज्वलसिंह राजे गायकवाड यांच्या हस्ते नियुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात आले.
यावेळी समस्त मराठा बांधवानी श्री. विनोदराव चव्हाण यांच्या पोलीस सेवेतील कारकिर्दीतील उत्कृष्ट कामाचे कौतुक केले. यावेळी श्री. विनोद चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पोलीस सेवेत 35 वर्षे काम केल्यानंतर आपण आता मराठा समाजासाठी काम करणार असून आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा      समाजाला मिळवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. हिंद मराठा महासनघाच्या माध्यमातून कोकणातील मराठा समाजाच्या आर्थिक व समाजिक विकासासाठी मी आपल्या सोबत आहे, आपण सर्वांनीच समन्वयाने काम करू अशी निसंदीगध ग्वाही चव्हाण यांनी दिली.यावेळी त्यांच्यासोबत त्यांची सुविद्य पत्नी उपविभागीय पोलीस अधिकारी  विभाताई चव्हाण, आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये हिंद मराठा महासंघाचे नवे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून ऍड आनंद भोसले  पुणे जिल्हाग्रामीण अध्यक्षपदी ॲड दिलीप पाटील तसेच प्रा संजय राव शिंदे यांची  राज्य सल्लागार प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती श्री. सदानंदराव भोसले यांनी दिली.
        या कार्यक्रमाला महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष सुधीर पालांडे,  राज्य उपाध्यक्ष महेश पालांडे, राज्य सरचिटणीस श्रीकांत चाळके, सह सचिव अनिल बुवा जाधव,कोकण प्रदेश महीला अध्यक्षा सौ ज्योती लक्ष्मणराव भोसले,  कोकण प्रदेश सरचिटणीस प्रवक्ते संजय रेवणे,  जिल्हा उपाध्यक्ष विजय येरूंकर,  नंदकुमार शिर्के, उत्तर रत्नागिरी महीला जिल्हा अध्यक्ष सायली संतोष भोसले, यांचे सह मुंबई, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पुणे आदी भागातील अनेक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित  होते अनेक आजी माजी वरीष्ठ पोलीस अधिकारी उद्योजक सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध मान्यवर यांनी लोकनेते श्री विनोदराव चव्हाण यांचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा सदिच्छा व्यक्त केल्या
Comments