पनवेल महापालिकेचाअग्निशमन विभाग अधिक सक्षम होणार ; नवीन वाहने खरेदी करण्यास महासभेची मंजूरी..
नवीन वाहने खरेदी करण्यास महासभेची मंजूरी..
पनवेल,/ दि.7 : - पनवेल महानगरपालिका अग्निशमन विभाग अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आज झालेल्या महासेभेत अग्निशमन विभागसाठी पाच वाहने नव्याने खरेदी करण्याच्या विषयास महासभेने मंजूरी दिली.
       महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे आज(19 एप्रिल) महासभा घेण्यात आली. यावेळी उपमहापौर सीताताई पाटील, आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, नगरसचिव तिलकराज खापर्डे, पालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.                             
      
      एकूण ११० चौ.कि.मी. इतके कार्यक्षेत्र असलेल्या पनवेल महानगरपालिका अग्निशमन विभागामार्फत नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे बचावकार्य करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान असलेले फायर फायटींग वाहने असणे अत्यंत गरजेचे आहे. सध्या पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये विविध वापराच्या उत्तुंग इमारती शॉपिंग मॉल्स, व्यवसायिक, शैक्षणिक वापराच्या इमारती अस्तित्वात असून मा. महाराष्ट्र शासनाने नव्याने मंजुरी दिलेला UDCPR या मुळे देखील किमान १० मजल्यापेक्षा उत्तुंग इमारती उभ्या राहत आहेत. या व्यतिरिक्त या क्षेत्रामध्ये आंतराष्ट्रीय विमानतळ, रेल्वे, मेट्रो रेल्वे, व्यवसायिक हब असे नवे प्रकल्पांचे निर्माण कार्य प्रगती पथावर आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेचा अग्निशमन विभाग अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने ॲडव्हान्स फायर इंजिन, रॅपिड इंटरवेन्शन व्हेईकल, मल्टीपर्पज टर्न टेबल लॅडर,वॉटर बाऊजर (18 किलो लीटर ), ॲडव्हान्सव रेस्क्यु टेंडर अशी विविध आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त पाच नवी वाहने खरेदी करण्याचा प्रस्ताव आज महासभेत मंजूर करण्यात आला.
    
 पूर्वाश्रमीच्या पनवेल नगर परिषदेमार्फत ६ वाणिज्य संकुलातील ३० वर्षांच्या कालावधीकरिता लिजवर भाडेतत्वावर देणेत आलेले गाळे लिज करारनामा करणेकामी तसेच हस्तांतरीत करारनामा करण्याचा विषय स्थगित करण्यात आला.
      
 पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती ‘अ’ प्रभाग क्र. ०३ मधील तळांना सेक्टर १५ येथे मुस्लिम समाजासाठी दफनभुमी तयार करण्याच्या विषयास महासभेने मंजूरी दिली.
चौकट
      कोविड 19 काळात कर्तव्य बजावतांना कोविडमुळे मृत्यु पावलेल्या  कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत विमा कवच किंवा सानुग्रह सहाय्य लागू करण्याबाबतचे निर्देश शासनाकडून आले होते. त्यानुसार पनवेल महानगरपालिकेचे कोविड 19 काळात कर्तव्य बजावतांना कोविडमुळे मृत्यु पावलेल्या कै.राजेश बागडे लिपीक, कै.लक्ष्मी गायकवाड आणि कै.गणपत पाटील या दोन सफाई कर्मचारी यांच्या वारसांना प्रत्येकी पन्नास लाखाच्या धनादेशाचे वाटप आज महापौर डॉ.चौतमोल,सभागृहनेते परेश ठाकूर, विरोधीपक्ष नेते प्रितम म्हात्रे, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, महिला बालकल्याण सभापती हर्षदा उपाध्याय यांच्या हस्ते करण्यात आले.
Comments