गुणवंत विद्यार्थी व शिक्षक सत्कार ; ज्ञानगंगा विशेष अंकाचे प्रकाशन..
गुणवंत विद्यार्थी व शिक्षक सत्कार ; 
ज्ञानगंगा विशेष अंकाचे प्रकाशन

कळंबोली (दीपक घोसाळकर) : -. रायगड जिल्हा खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी संघटनेच्या प्रथम वर्धापन दिनाचे औचित्य साधून ज्ञानगंगा या विशेष अंकाचे प्रकाशन प्रमुख पाहुणे माजी शिक्षण उपसंचालक व्ही.एस.म्हात्रे,माजी प्राचार्य के.डी.म्हात्रे,  व संघटनेचे अध्यक्ष संदीप कदम   विशेषअंक संपादक धनाजी घरत आदी मान्यवरांच्या हस्ते १७ एप्रिल रोजी करण्यात आहे.
         
संघटनेचे अध्यक्ष संदीप कदम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी  कार्याध्यक्ष साईनाथ गावंड, सरचिटणीस यशवंत मोकल,  उपाध्यक्ष सुधाकर जैवल, सौ. मिनाक्षी कर्वे  कोषाध्यक्ष संतोष बारी, स्मरणिकेचे संपादक धनाजी घरत, सल्लागार विकास मांढरे संघटक संतोष जाधव,सचिन सावंत, दिपक सुर्यवंशी, देवेंद्र केळूसकर, ज्ञानेश्वर ठाकूर, सुगिंद्र म्हात्रे, मेघा मोरे, जिल्ह्यातील मुख्याध्यापक  प्रभारी मुख्याध्यापक शिक्षक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
    याप्रसंगी शिष्यवृत्ती धारक,१० वी ,१२ वी, पदवीधर यांच्यासह गुणवंत विद्यार्थी, आदर्श शिक्षक, निवृत्त मुख्याध्यापक,  उत्कृष्ट संघटक आदींचा सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक, भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
      प्रमुख पाहुणे व्ही. एस. म्हात्रे यांनी सांगितले की शिक्षकांनी शालेय विद्यार्थी घडवणे काळाची गरज ओळखून  माहिती पुर्ण घेऊनच समस्या मांडाव्यात असे सांगून  शिक्षक मान्यतेसाठी लागणारी  आवश्यक  कागदपत्रे, सहीचा प्रस्ताव, आर टी ई मान्यता प्रस्ताव,वरिष्ठश्रेणी व निवडश्रेणी प्रस्ताव यासाठी लागणारी सर्व कागदपत्रांची यादी संघटनेने प्रत्येक शाळेकडे दिली पाहिजे  तसेच पॅटर्न व बोर्ड बदलले तरी अध्ययन
अध्यापन प्रकिया कायम सुरूच राहणार असून  नवीन शैक्षणिक धोरणाची माहिती देणारा लेख वाचून मनाला आत्मीयता मिळाली. रायगडचे शिक्षणाधिकारी असताना आलेले चांगले वाईट अनुभव कथन केले.तर  के.डी.म्हात्रे यांनी सांगितले की संघटनेमुळे आपल्याला  बळ मिळाले असून प्राथमिक शिक्षक हाच सक्षम पिढी घडवू शकतो. आज इंजिनिअर पेक्षा शिक्षकी पेशा  उत्तम असून माझा शिक्षक बांधव जबाबदारीने काम करताना दिसतो. नवीन शैक्षणिक धोरणाचा परिपुर्ण वापर  करून नवीन पिढी अधिक सक्षम करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करावे व आदर्श विद्यार्थी घडवून शैक्षणिक कार्यात आत्मीयतेने काम करून संघटनेच्या कार्याला बळकटी द्यावे असे मोलाचे मार्गदर्शन केले.
     प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. प्रास्ताविकातून सरचिटणीस यशवंत मोकल यांनी संघटनेच्या वर्षभरातील कार्याचा  आलेख वाचून दाखवला.उपाध्यक्ष सुधाकर जैवल यांनी संघटनेच्या यशाची ध्येयधोरणे व  वाटचालीविषयी सांगून केवल शैक्षणिक नाही तर सामाजिक बांधिलकी जोपासून संघटनेच्या हितासाठी करत असलेल्या विविध उपक्रमांची मालिका वाचून दाखवली. कार्याध्यक्ष साईनाथ गावंड यांनी शासकीय कामांची व संघटनेच्या हिताची माहिती सांगितली. अध्यक्षीय भाषणात संदीप कदम यांनी सांगितले की  रायगड जिल्ह्यातील शिक्षक बांधवांनी एकत्र येऊन कणखर व सक्षम संघटना उभी करून संघटनेच्या हितासाठी सदैव काम करणार व शिक्षक बांधवांना न्याय देण्यासाठी  प्रामाणिकपणे येणा-या समस्या सोडवण्यासाठी   निश्चित प्रयत्नांची पराकाष्ठा करून संघटनेला मजबूती देणार असे अभिवचन दिले.  शिक्षकांनी तयार केलेल्या मनोरंजनात्मक नाटीका, पोवाडा ,आजची सावित्री, प्रादेशिक वेशभुषा सादरीकरण  आदीमुळे नवचैतन्य आले व कार्यक्रमाची रंगत वाढली. मेघा मोरे ,गितांजली साळवी देवेंद्र केळूसकर , सचिन सावंत, दिपक सुर्यवंशी,नरेंद्र पाटील,  ज्ञानेश्वर ठाकूर, राजेश पाटील यांच्यासह अनेकांनी  सुत्रसंचलन करून कार्यक्रमाची गोडी वाढवून  रसिकांना मंत्रमुग्ध केले.  पनवेल उरण कमिटीने गेली आठ दिवस कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रर घेऊन उपस्थितांची मने जिंकली.
Comments
Popular posts
देशाचे पुढचे राजकारण आपल्या मनासारखे होण्यासाठी इंडियाने एकरूप होऊन काम करावे लागेल - शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते..
Image
नैना हटाव शेतकरी बचाव अंतर्गत सिडकोविरोधातील शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला शिवसेनेचा(उद्धव बाळासाहेब ठाकरे) सक्रिय पाठिंबा..
Image
बाबासाहेब लिगल पँथर संघटनेच्या नेतृत्वात पनवेलमध्‍ये प्रथमच भव्य संविधान सम्मान शोभायात्रा(मिरवणुक)संपन्न...
Image
१५ वर्षीय मुलाला कायदेशीर रखवालीतून नेेले पळवून...
Image
तुरमाळे येथील नैना विरोधातील आमरण उपोषणास भेट देत शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते यांनी दिला पाठींबा...
Image