आ.प्रशांत ठाकूर व आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते लोकार्पण.
पनवेल दि,११ (संजय कदम): पनवेलसह नवी मुंबईतील पहिली अजूरिऑन फिलिप्स कॅथलॅब, फिलिप्स डिजीटल एम. आर. आय. व तोशीबा कॅनॉन ३२ स्लाईस सी.टी. स्कॅन मशिन पनवेल येथील गांधी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली असून त्याचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर व पनवेल महापालीकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी फीत कापून जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिले आहे.
या लोकार्पण सोहळ्याला पनवेलच्या महापौर डॉ कविता चौतमोल, उपमहापौर सीताताई पाटील, सभागृहनेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, राजू सोनी, नगरसेविका दर्शना भोईर, वर्षा प्रशांत ठाकूर, संजय जैन, गांधी हॉस्पिटलचे डॉ प्रमोद गांधी, यांसह अनेक नामांकित डॉक्टर्स, राजकीय प्रतिनिधी व पनवेलकर उपस्थित होते.
सदर ठिकाणी विविध प्रकारच्या अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने अजूरिऑन कॅथलॅबची वैशिष्ट्ये म्हणजे हार्ट अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, स्टेंट बूस्ट लाईव्ह, कार्डियाक स्विंग, डायनामिक करोनरी रोड मॅप, ब्रेन डी.एस.ए. स्टेन्टींग, कॉइलिंग पेरिफेरल अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी मोस्ट अॅडव्हान्सड कॅथलॅब इन नवी मुंबई लोएस्ट रेडिएशन एक्सपोजर असणार आहे. तर डिजिटल फिलिप्स एम. आर. आय. ची वैशिष्ट्ये ही संपूर्ण बॉडी एम. आर. आय, न्यूरो इमेजिंग, पेटस एम. आर. आय., मेटल आर्टिफॅक्ट रिडक्शन एम. आर. आय., एम. आर. आय. ब्रेस्ट मॅमोग्राफी, कार्डियाक एम. आर. आय., मुस्क्युलोस्केलेटल एम. आर. आय., औंको एम. आर. आय., रिनल इनसफिशियन्सी पेशंट फ्रेंडली एम.आर.आय., कमीत कमी एकॉस्टिक साउंड, डिजीटल क्लरिटी, फास्ट एम. आर. आय आहे. तसेच तोशीबा कॅनॉन सी.टी. स्कॅनची वैशिष्ट्ये ही ३२ स्लाईस, मेटल आटिफॅक्ट रिडक्शन सिक्किन्स, सी.टी. गायडेड बायोप्सी, लंग व्हॉल्यूम अॅनालिसिस, आयोडिन मॅपिंग, व्हरच्युअल एन्डोस्कोपी अशी असणार असून आता गांधी हॉस्पिटलची हार्ट केअर सोबत नवी ओळख निर्माण झाली आहे. यासाठी कॅथलॅब टीम म्हणून डॉ. अविनाश गुठे (कार्डिओलॉजिस्ट), डॉ. ऋषीकेश ठाकूर (कार्डिओलॉजिस्ट), डॉ. सागर तांडेल. (कार्डिओलॉजिस्ट), डॉ. केशव काळे (कार्डिओलॉजिस्ट), डॉ. अनुज साठे (कार्डिओलॉजिस्ट), डॉ. मुग्धा ठाकूर (कार्डिओलॉजिस्ट) तर ब्रेन डी. एस. ए. टीम म्हणून डॉ. नीरज पटनी (न्यूरोसर्जन), डॉ. किशोर जाधव (न्यूरोलॉजिस्ट), डॉ. जयेंद्र यादव (न्यूरोलॉजिस्ट), डॉ. समीर काळे (इंटरव्हेंशनल न्यूरोसर्जन) तसेच एम. आर. आय. व सी.टी. स्कॅन टीम म्हणून डॉ. प्रतीक पाटील (रेडिओलॉजिस्ट), डॉ. सुशील पाटील (इंटरव्हेंशनल रेडिओलॉजिस्ट), डॉ. अक्षय गुरसाळे (इंटरव्हेंशनल रेडिओलॉजिस्ट) हे काम पाहणार आहेत.
फोटो : लोकार्पण करताना आमदार प्रशांत ठाकूर व आयुक्त गणेश देशमुख.