आर्या वनौषधी संस्थेचा ' कडुनिंब दिवस ' उत्साहात साजरा..
आर्या वनौषधी संस्थेचा ' कडुनिंब दिवस ' उत्साहात साजरा..

पनवेल (प्रतिनिधी) : -  आर्या वनौषधी संस्थेच्यावतीने गुढीपाडवा हा दिवस ' कडुनिंब दिवस ' म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
       मानवाने विश्वस्त म्हणून पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आपल्या परिसरात कडुनिंबा सारख्या वृक्षांची लागवड करावी असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी केले होते.या आवाहनास पर्यावरण प्रेमींचा उदंड प्रतिसाद लाभला.अलिबाग,पेण,पनवेल,उरण,जळगाव,
वेंगुर्ले, बोईसर येथे २७० कडुनिंबाची झाडे वाटप व लागवड करण्यात आली.
        
 सदर कार्यक्रमांमध्ये साक्षी राऊत (चांदोरकर), चंद्रकांत घोणे, हेमा पांचाळ,शशिकांत म्हात्रे, समीर पाटील,श्रीविद्या सरोदे, डॉ.अशोक तांबेकर,आयकर विभाग स्थानिक लोकाधिकार समितीचे सह कार्याध्यक्ष नंदू खोत,जयंत पाखरे,मोहन पाटील, हेमंत म्हात्रे,जनार्दन पाटील,चेतन पाटील,विणा म्हात्रे,मिताली गुरव  आदी मान्यवरांसह निलेश घोणे, ओम पांचाळ,संपदा पोंगडे,सीमा शेडगे,प्रसाद शेडगे,परी शेडगे, शुभ्रा शेडगे,सुमित्रा पोंगडे,संदीप पोंगडे,रंजना मेंगाळ,बाबू मेंगाळ, उमेश मेंगाळ,जनाबाई पिंगळा, उलका पिंगळा,राखूबाई मेंगाळ, मंगेश पिंगळा,जानकी पवार, कु.अंश पाटील,पिंट्या गायकवाड ग्रुप आदी पर्यावरणप्रेमी सहभागी झाले होते.
        यावेळी आर्या वनौषधी संस्थेच्यावतीने कडुनिंबाच्या औषधी गुणधर्माची माहिती असलेली पत्रके वनौषधी प्रेमींना भेट देण्यात आली.या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले.
 आर्या वनौषधी संस्थेचा ' कडुनिंब दिवस '
Comments