पनवेल बार असोसिएशन तर्फे महिला दिन साजरा..
पनवेल बार असोसिएशन तर्फे महिला दिन साजरा
पनवेल, दि.8 : (संजय कदम) ः पनवेल तालुका विधी सेवा समिती आणि पनवेल बार असोसिएशन, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधून पनवेल महिला वकील वर्ग व पनवेल कोर्ट महिला स्टाफ ह्यांचे विनामुल्य हिमोग्लोबीन व थायरॉइड टेस्ट करण्यात आली.  पनवेल येथील अ‍ॅरोहेड लॅब, पनवेल यांनी सहकार्य केले.
सदर उपक्रमास सर्व महिलांनी रक्त चाचणी करून चांगला प्रतिसाद दिला. सदर उपक्रमाचे उद्घाटन जिल्हा न्यायाधीश 1 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पनवेल रायगड अस्मर, तदर्थ जिल्हा न्यायाधीश 1 व सहाय्यक सत्र न्यायाधीश, पनवेल रायगड भाकरे, जिल्हा न्यायाधीश 3 व सहाय्यक सत्र न्यायाधीश पनवेल रायगड  शिंदे यांनी केले.तसेच महिला दिन निमित्ताने जिल्हा न्यायाधीश 2 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पनवेल रायगड, श्रीमती माधुरी आनंद तसेच दुसरे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पनवेल, श्रीमती गोडसे, दुसरे न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग, पनवेल श्रीमती पाटील ह्यांनी महिला सक्षमीकरण ह्या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पनवेल वकील संघटनेच्या अ‍ॅड. अस्मिता भुवड, अ‍ॅड. हेमा भगत, अ‍ॅड. सीमा भोईर ह्यांनी विशेष परिश्रम घेतले.


फोटो ः पनवेल बार असोसिएशनतर्फे महिला दिन संपन्न
Comments