दोन लाखांची ऑनलाईन फसवणूक ..

दोन लाखांची ऑनलाईन फसवणूक 

पनवेल / वार्ताहर -  : ऑनलाइन आधार कार्ड अपडेट करतो त्यासाठी मोबाईल मध्ये टीम व्युवर क्विक सपोर्ट नावाचे ॲप डाऊनलोड करण्यास सांगून बँकेतून दोन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

         तक्का, निलसिद्धी गार्डन येथील नवीनचंद्र प्रकाशचंद्र पांडे यांना मोबाईलवर एक मेसेज आला होता. त्यावेळी तुमचे सिमकार्ड ब्लॉक होणार असून आधार कार्डचे केवायसी अपडेट करा असा मेसेज होता. त्यांनी मेसेजमधील कस्टमर केअर नंबरवर फोन केला. या वेळी कुलदीप बोलत असल्याचे सांगून आधार कार्ड अपडेट करून घेण्यास सांगितले. यावेळी आधार कार्ड ऑनलाइन अपडेट होईल त्यासाठी दहा रुपये चार्जेस लागतील असे सांगून मोबाईलमध्ये टीम व्युवर क्विक सपोर्ट नावाचे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. समोरील व्यक्तीने या ॲपचा कोड विचारला व दहा रुपयाचा रिचार्ज करण्यास सांगितले. यावेळी ओटीपी आला व त्यांच्या अकाउंट मधून दोन लाख सात हजार रुपये वजा झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पांडे यांनी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

Comments