तळोजा एम आय डी सी मधील रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत मोठे नुकसान ; सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही
 सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही.. 
पनवेल दि ०७(संजय कदम): पनवेल जवळील तळोजा औद्योगिक वसाहत मधील रासायनिक कंपनीला मध्य रात्रीच्या सुमारास  लागलेल्या आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाले असे तरीही सुदैवाने कोणतीही जीवित हानी जाही नाही आहे. तळोजा औद्योगिक वसाहती मधील प्लॉट नं १७/२२ मॉर्सन केमिकल कंपनीमध्ये मध्य रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच तळोजा पोलीस ठाण्याचे पथक तसेच अग्नीशमन दलाचे पथक घटना स्थळी रवाना झाले व त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून पहाटे चारच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवले, आगीमध्ये कुठल्याही प्रकराची जीवित हानी नाही झाली. सादर आग हि शॉर्टसर्किट मुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

Comments