अनुव्रत विश्व सोसायटी तर्फे ईको - फ्रेंडली होळी खेळण्याचे आवाहन..
सहप्रचारक शिवसेना शाखा पनवेल शहर ..

पनवेल / प्रतिनिधी : - अनुव्रत विश्व सोसायटी तर्फे ईको - फ्रेंडली होळी खेळण्याचे आवाहन सर्व नागरिकांना करण्यात आले आहे याचे सहप्रचारक शिवसेना पनवेल शहर शाखा आहे, तसे आवाहन दोघांच्या संयुक्त विद्यमाने शिवसेना पनवेल शहर शाखेत करण्यात आले.

स्वस्थ होळी, सुस्वभावाची होळी या ब्रीद लाईन अंतर्गत पाण्याचा वापर टाळा, केमिकल युक्त रंगांचा वापर टाळा,प्राकृतिक गुलालाचा वापर करा,मैत्री व सद्भावना वाढवा,तसेच प्रतिष्ठापूर्ण पद्धत स्वीकारून आपले जीवन संयमी बनवा असे आवाहन यावेळी करण्यात आले.

यावेळी पनवेल शहर प्रमुख प्रवीण जाधव, उपशहरप्रमुख सुजन मुसलोंडकर, सनी टेमघरे,शैलेश जगनाडे,अब्रार मास्टर, शाखा प्रमुख संतोष तळेकर,अभिजित साखरे,आकाश भोईर,नंदू मांढरे,दिलीप शेलार,प्रशांत नरसाळे, किरण गायकवाड,विजय शिंदे तसेच अनुव्रत विश्व भारती सोसायटीचे रायगड संयोजक राजेश मेहता,पूर्व संयोजक सुरेश पटवारी,सदस्य जयेश सामर,प्रमोद डांगी,पदम चोरडिया आदींच्या उपस्थित सर्व नागरिकांना ईको फ्रेंडली होळी खेळण्याचे आवाहन सर्व नागरिकांना करण्यात आले.
Comments