शिवदास कांबळे रायगड जिल्हा परिषदेचा 'रायगड भूषण' २०२२ पुरस्काराने सन्मानित..
पनवेल शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष शिवदास कांबळे यांना रायगड जिल्हा परिषदेचा रायगड भूषण 2022 पुरस्काराने गौरव..
पनवेल, दि.4 (वार्ताहर) ः पनवेल मधील सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळातील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनील तटकरे यांचे कट्टर समर्थक म्हणून पनवेलकरांच्या परिचयाचे असलेल्या व बुद्धिजीवी राजकारणी म्हणून ओळख असलेले डॉ. शिवदास विठ्ठल कांबळे यांना रायगड जिल्हा परिषदेने 2022 रायगड भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
डॉ.शिवदास विठ्ठल कांबळे यांना रायगड जिल्हा परिषदेच्यावतीने अलिबाग येथे रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कुमारी योगिता पारधी व महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड कुमारी आदिती सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. शिवदास विठ्ठल कांबळे यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने सामाजिक न्याय विभागाच्या सर्वोच्च डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण  यांच्या हस्ते सन्मानित करून त्यांच्या सामाजिक व वंचित घटकांसाठी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आलेला आहे. पनवेल मधील अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थांची त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध असून त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. पनवेलच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळामध्ये शिवदास कांबळे नेहमीच आपल्या वैशिष्ट्यपूर्ण भूमिकेमुळे सर्वांना परिचित आहेत. डॉ. शिवदास कांबळे यांना त्यांच्या या यशाबद्दल सर्वस्तरातून सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांबरोबर जनसामान्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपूर्ण कार्यकारणी व राष्ट्रवादी परिवारातर्फे शिवदास कांबळे यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.


फोटो ः शिवदास कांबळे
Comments