महिलादिनी शिवसेना महिला आघाडीतर्फे कर्तृत्ववान महिलांचा गौरव..
महिलादिनी शिवसेना महिला आघाडीतर्फे कर्तृत्ववान महिलांचा गौरव
पनवेल / प्रतिनिधी : -  शुक्रवार दिनांक ११/३/२०२२ रोजी पनवेल महिला आघाडीने शिवसेना पंनवेल शहर शाखेमध्ये 'महिला दिनाचे' औचित्य साधून पनवेलमधील कर्तुत्ववान महिलांचा गौरव करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.
 डॉ.समिधा ययाती गांधी (दंतवैद्य), करुणेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट संचालित करुणेश्वर ओल्ड एज केअर हाऊस, संचालिका सौ. करुणा ईश्वर ढोरे, सौ. सानिका मोरे, यशस्वी उद्योजिका, मोनाली चौधरी पनवेल शहर पोलीस स्टेशन, सहा पोलीस निरीक्षक, वृषाली पवार, पनवेल शहर पोलीस स्टेशन, कु. उन्नती संग्रामसिंग परदेशी, सांगली येथील जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत बेस्ट चॅलेंजर म्हणून विशेष गौरव, कु. भाग्यश्री दत्तात्रेय साळुंखे, सांगली येथील जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत ६० वजनी गटात 'कास्य' पदक मिळविले आहे. 
कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. रेखाताई ठाकरे, (रायगड जिल्हा संघटिका) लाभल्या. सौ. कल्पनाताई पाटील (उपजिल्हा संघटिका),  सौ. शुभांगी शेलार (महानगर संघटिका), सौ. प्रमिला कुरघोडे (पनवेल तालुका संघटिका), श्रीमती सुनंदा पाटील (उप तालुका संघटिका), श्रीमती रुही सुर्वे  (पनवेल शहर संपर्क संघटिका), सौ. अर्चना कुळकर्णी (शहर संघटिका), सौ. उज्ज्वला गावडे (उपशहर संघटिका), सौ. हर्षाली परायेकर (विभाग संघटिका),सौ. सुचित्रा शिर्के (शाखा संघटिका), सौ. रेश्मा कुरुप(विभाग संघटिका, प्रभाग २०), सौ. टीया अरोरा-धुमाळ(उपतालुका संघटिका-खारघर), श्रीमती शुभांगी टाकळे(माजी नगराध्यक्षा),  सौ. शितोळे, कर्जत या आजी माजी महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होत्या.
यावेळी पनवेल शिवसेना महिला आघाडीने सौ. रेखा ठाकरे यांना हॉटेल क्षेत्रातील यशस्वी उद्योजिका म्हणून सन्मानित केले.
Comments