काँग्रेस पक्षाच्या डिजिटल सभासद नोंदणी अभियानाबाबत उलवे येथे आढावा बैठक संपन्न
काँग्रेस पक्षाच्या डिजिटल सभासद नोंदणी अभियानाबाबत उलवे येथे आढावा बैठक संपन्न

पनवेल / वार्ताहर : -  भारतीय काँग्रेसच्या वतीने डिजिटल सदस्य नोंदणीचे अभियान हाती घेण्यात आले होते. मागील वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासून देशपातळीवर सुरू झालेल्या या अभियानाला जानेवारी महिन्यात महाराष्ट्र राज्यामध्ये प्रारंभ करण्यात आला. ३१ मार्च रोजी डिजिटल सदस्य नोंदणी अभियानाची सांगता होत आहे. आत्तापर्यंत झालेल्या नोंदणीची आणि यापुढील नोंदणीची रणनीती यांची चर्चा करण्यासाठी पनवेल तालुक्यातील उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स च्या सभागृहात आज कोकण विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या अभियानाचे प्रमुख, काँग्रेस पक्षाचे पी आर ओ, माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली. डिजिटल सदस्य नोंदणी अभियानाच्या असिस्टंट पी आर ओ, राजस्थान मधील आमदार, सुवर्ण पदक विजेत्या थाळीफेक पटू, अर्जुन पुरस्कार प्राप्त कृष्णा पुनिया यांची उपस्थिती या आढावा बैठकीचे विशेष आकर्षण ठरली.  

रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या उत्तम नियोजनाचे या वेळी तमाम उपस्थितांनी कौतुक केले. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सचिव, या अभियानाचे कोकणा प्रभारी बी एम संदीप, कृष्णा पुनिया, अभियानाचे राज्य समन्वयक आमदार प्रणिती शिंदे, भाई नगराळे, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष तथा कोकण विभागाचे प्रभारी नसीम खान यांनी यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. या आढावा बैठकीला समन्वयक डिजिटल नोंदणी राहुल साळवे, रायगडच्या प्रभारी चारुलता टोकस, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारी हुस्न बानो खलिफे, राणी अगरवाल, प्रमोद मोरे,राजन भोसले, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आर सी घरत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष कॅप्टन कलावत आदी मान्यवरांसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments