ड्रायव्हरचा हलगर्जीपणा ; हायवेवरून टँकर २० फूट खाली कोसळला ..
ड्रायव्हरचा हलगर्जीपणा ; हायवेवरून टँकर २० फूट खाली कोसळला 
पनवेल दि,१९ (संजय कदम): पुण्याहून मुंबईला निघालेल्या केमिकल भरलेला टँकर एक्सप्रेस हायवेवरील पनवेलजवळील नेवाळी ब्रिजजवळ आला असता चालकाच्या हलगर्जीपणामुळे रस्तासोडून २० फूट खाली कोसळल्याने टँकरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातात चालक अरविंद यादवयाला आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघातात टँकरची पुढील चाके निखळली असून बाजूला फेकली गेली आहेत. यावरून या अपघाताची भीषणता दिसून येते. चालक अरविंद यादव वय ४२ हा हाजीमलंग रोड कल्याण येथील रहिवासी आहे. सदर अपघाताबाबत खांदेश्वर पोलीस ठाणे पनवेल येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



फोटो: अपघात



Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image