पनवेल परिसरात अनैतिक व्यवसाय करणार्‍या 5 जणांविरुद्ध कारवाई..
पनवेल परिसरात अनैतिक व्यवसाय करणार्‍या 5 जणांविरुद्ध कारवाई

पनवेल, दि.4 (वार्ताहर) ः पनवेल परिसरात उघड्यावर अश्‍लिल हावभाव व लज्जास्पद असे कृत्य करणार्‍या 5 जणींविरोधात पनवेल शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.
शहरातील एस.टी.स्टॅण्ड परिसर तसेच भाजी मार्केट परिसरात काही महिला या भर रस्त्यातच अश्‍लिल हावभाव व गिर्‍हाईकांना खुणावणे व लज्जास्पद असे कृत्य करणे त्यामुळे सर्वसामान्य महिलांना येथून ये-जा करण्यास जिकरीचे बनले होते. याबाबतची तक्रार महिला मंडळाने पनवेल शहर पोलीस ठाण्यात करताच वपोनि विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहा.पो.नि.वृषाली पवार व त्यांच्या पथकाने अचानकपणे धाड टाकून 5 जणींना ताब्यात घेवून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली आहे व यापुढे सुद्धा अशा प्रकारे कृत्य करणार्‍या महिलांविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांनी दिली आहे.
Comments