तेजस्विनी फाऊंडेशन व पनवेल महापालिका यांच्या तर्फे आदई गार्डन येथे स्वच्छता मोहीम
पनवेल / वार्ताहर : -
तेजस्विनी सामाजिक व सांस्कृतिक फाऊंडेशन अलिबाग रायगड नवी मुंबई पनवेल शाखा व पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आदई गार्डन न्यू पनवेल येथे शिवजयंती दिनाचे औचित्य साधून नुकतेच स्वच्छता अभियान मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यात आले.
यावेळी कार्यक्रमासाठी पनवेल महानगरपालिकेचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी पनवेल महानगरपालिका आरोग्य विभाग निरीक्षक शैलेश गायकवाड, अरुण कांबळे, पनवेल महानगरपालिका आरोग्य अधिकारी अभिजीत भवर, पनवेल महानगरपालिका स्वच्छता विभाग सुपरवायझर क्रांती चित्रे, पनवेल महानगरपालिका स्वच्छता विभाग कर्मचारी अरुण शिंदे, रमेश बेत्ती, संतोष कांबळे इ. मान्यवर मंडळी उपस्थित होते. यावेळी तेजस्विनी फाउंडेशन संचालिका तसेच नवी मुंबई शाखा प्रमुख राखी पाटील, तेजस्विनी फाऊंडेश सदस्या व पनवेल तालुका उपविभाग प्रमुख जयश्री विजय खुटले, खजिनदार विजय गजानन पाटील इ मान्यवर मंडळी उपस्थित होते.
राखी पाटील यांनी स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करीत असताना सरकारी यंत्रणेला प्रत्येकवेळी दोष न देता आपल्या रहात्या ठिकाणाचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे ही आपली नैतिक जबाबदारी असल्याचे यावेळी सांगितले.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शैलेश घरत, विवेक पाटील, सुनिता अदावले, दीपक लाडे, निर्जरा खुटले, विनोद मोरे, सह्याद्री प्रतिष्ठानचे प्रवीण ठाकूर, बळीराम पाटील, गंगाराम मायदे, काशिनाथ माने, वैशाली चंदनशीवे, वंदना निर्मल, वंदना येरुणकर, जयतून शेख इ मान्यवरांनी मेहनत घेतली. कार्यक्रम यशस्वीरित्या राबविल्याबद्दल तेजस्विनी फाऊंडेशनच्या अध्यक्षा जिविता पाटील यांनी सर्व मान्यवर व सदस्यांचे आभार व्यक्त केले.